Take a fresh look at your lifestyle.

राष्ट्रवादीला आवडतोय भाजपचाच घरोबा; शिवसेनेला दूर सारून पुन्हा घेतली पक्षविरोधी भूमिका..?

अहमदनगर :

Advertisement

देशभरात काँग्रेस आणि भाजप यांच्यामध्ये थेट छत्तीसचा आकडा असतानाच इतर पक्ष मात्र विचार सोडून एकमेकांशी घरोबा करून सत्तासोपान चढत आहेत. त्यात महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेला राष्ट्रवादी काही मागे नाही. अहमदनगर महापालिकेत या पक्षाने ‘नैसर्गिक’ मित्रांना बाजूला सारत पुन्हा एकदा भाजपशी घरोबा केला आहे.

Advertisement

अहमदनगर शहरात शिवसेना आणि राष्ट्रवादी हे दोन्ही तुल्यबळ पक्ष आहेत. मात्र, राज्यात एकमेकांच्या साथीने काम करणारे हेच पक्ष अहमदनगरमध्ये एकमेकांच्या विरोधात शड्डू ठोकून आहेत. राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखालील नगरसेवकांनी भाजपचे महापौर बाबासाहेब वाकळे यांचे हात बळकट केले आहेत.

Advertisement

महापालिकेच्या स्थायी समिती सभापतिपदासाठी राष्ट्रवादीचे अविनाश घुले यांनी मंगळवारी अर्ज दाखल केले. महापाैर तथा भाजपचे नेते वाकळे यांच्या उपस्थितीत त्यांनी अर्ज दाखल केल्याने राष्ट्रवादी व भाजप युतीवर शिक्कामोर्तब झाल्याचे मानले जात आहे. शिवसेनेला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी जगताप यांनी ही खेळी पुन्हा एकदा केल्याचे म्हटले जात आहे.

Advertisement

पक्षाध्यक्ष शरद पवार हे भाजपच्या वैचारिक मुद्द्यांवर वेळोवेळी टीका करत असतानाच अहमदनगरमध्ये त्यांच्याच शिलेदारांनी थेट भाजपला सत्तासोपान चढवले आहे. त्यामुळे एकेकाळी भाजपला राज्यात सत्ताधारी बनवणाऱ्या राष्ट्रवादीच्या भूमिकेवर पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित होण्यास सुरुवात झालेली आहे. यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची कोणती प्रतिक्रिया आहे, हे अजूनही जाहीर झालेले आहे.

Advertisement

नगर राष्ट्रवादीची ही भूमिका पक्षाच्या विरोधात आहे की हे शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संमतीने चालू आहे, याचेच कोडे सर्वांना यानिमित्ताने पुन्हा एकदा पडले आहे. यामुळे नगरला पुन्हा एकदा अजित पवार व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पहाटेचे शपथविधी आणि राष्ट्रवादीने भाजपला बाहेरून पाठींबा देऊन राज्याची सत्ता दिल्याचे प्रसंग आठवत आहेत.

Advertisement

संपादन : सचिन मोहन चोभे  

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply