मुंबई :
पर्यावरणाचा होणारा ऱ्हास हा खूप महत्वाचा मुद्दा असतानाही त्याकडे जगभरात दुर्लक्ष केले जात आहे. हा एक अडचणीचा मुद्दा असल्याचीच सरकारी यंत्रणेची भावना आहे. महाराष्ट्र राज्यातही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळात या भावनेत बदल झालेला नसल्याचे स्पष्ट झालेले आहे. परिणामी राज्यातील ‘जैवविविधते’चा मुद्दाच बासनात गुंडाळण्याची किमया प्रशासनाने साधली आहे.
माजी वनमंत्री संजय राठोड हे पायउतार झाले तरीही त्यांनी कधीच या मुद्द्याला महत्व दिले नाही. वर्षभरापासून हे मंडळ अध्यक्ष व सदस्यांविना सुरू असून, सध्या वनखाते मुख्यमंत्र्यांनी स्वत:कडेच ठेवलेले असल्याने नियुक्त्या होण्याची मागणी होण्यास सुरुवात झाली आहे.
जैवविविधतेचे संवर्धन व संरक्षण करण्यासाठी २ जानेवारी २०१२ रोजी नागपुर येथे जैवविविधता मंडळाचे मुख्यालय स्थापन केले. मात्र, या मंडळाकडे कोणत्याही सरकारने विशेष लक्ष दिले नाही. कंत्राटी अधिकारी-कर्मचारी आणि वन विभागातील निवृत्त अधिकाऱ्यांच्या भरवशावर या मंडळाचा गाडा सुरू आहे.
फेब्रुवारी २०२० ला मंडळाचे अध्यक्ष डाॅ. विलास बर्डेकर यांचा, तर मार्च २०२० मध्ये पाच अशासकीय सदस्यांचा कार्यकाळ संपुष्टात आल्यानंतर तिथे नव्याने नेमणुका करण्याचे स्वारस्य नोकरशाहीने दाखवलेले नाही. तसेच राज्यात शहरी आणि ग्रामीण मिळून २८,२४६ जैवविविधता व्यवस्थापन समित्यांचे उद्दिष्ट असतानाही मागील ९ वर्षांमध्ये फ़क़्त ५,३६६ जैवविविधता नोंद वह्या तयार झालेल्या आहेत.
संपादन : सचिन पाटील
कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com
| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल |
मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com
- घर सजावट आणि आरोग्य : ‘त्या’ चार झाडांची रोपे देतील ‘सुकून की निंद’..!
- NTPC मध्ये नोकरीची संधी; पहा काय आहेत नियम आणि पात्रतेच्या अटी
- मोदी सरकारने घेतले ‘ते’ महत्वाचे निर्णय; करणार ऑक्सिजन व रुग्णांच्या सोयीसाठीची तरतूद
- महाराष्ट्रात सुरू आहे ‘अशी ही पळवापळवी..’; सोमय्यांनी वेधले ‘त्या’ मुद्द्याकडे लक्ष
- आणि म्हणून पाकिस्तानने घातली फेसबुक, युट्युब, ट्विटर, व्हाटस्अपवरही बंदी; पहा नेमका काय घेतलाय निर्णय