Take a fresh look at your lifestyle.

राज्यातील ‘त्या’ शहरात हळदीला मिळतोय सोन्याचा भाव; वाचा, काय आहे कारण

सांगली :  

Advertisement

कोरोनामुळे आयुर्वेदाला आणि घरगुती उपायांना अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले. त्यातही सर्वात महत्वाची ठरली ती हळद. हळदीत खूप औषधी गुण असतात आणि इतर औषधी गोष्टींच्या तुलनेत हळद ही स्वस्त आणि परवडणारी असते. परिणामी बहुतांश लोकांच्या घरात हळद विविध गोष्टींसाठी वापरली जाते.

Advertisement

दिवसेंदिवस हळदीचे महत्व वाढत असताना एक मोठी बातमी समोर आली आहे. सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हळदीला आताच्या हंगामात सोन्याचा भाव मिळताना दिसत आहे. हळदीच्या सौद्यात राजापुरी हळदीस ऐतिहासिक 30 हजार प्रति क्विंटल पर्यंत दर मिळाला आहे. बाजार समिती स्थापन झाल्यापासूनचा हा ऐतिहासिक दर राहिला आहे.  

Advertisement

सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी राजापुरी हळदीस उच्चांकी 30 हजार प्रतिक्विंटल भाव मिळाला. सरासरी भाव 16 ते 17 हजार रुपये आहे. उच्च प्रतीच्या हळदीस 25 ते 27 हजार असा दर मिळत आहे. यामुळे यंदाच्या हंगामात मार्केट यार्डात हळदीची विक्रमी उलाढाल होण्याची शक्यता आहे.

Advertisement

संगमेश्वर टेडर्समध्ये झालेल्या सौद्यामध्ये कर्नाटकमधील बेळगाव जिल्ह्यातील मुडलंगी तालुक्यातील गुरलापूर येथील शेतकरी रामाप्पा बसाप्पा मगोंडर यांच्या राजापुरी हळदीला क्विंटलला तब्बल 30 हजार रुपये असा उच्चांकी दर मिळाला.

Advertisement

संपादन : स्वप्नील पवार

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply