Take a fresh look at your lifestyle.

‘त्या’ ८८८० पदांच्या भरतीबाबत सरकारचे सकारात्मक उत्तर; पहा कधी होणार पदभरती

मुंबई :

Advertisement

शेतकरी आणि सरकार यांच्यामधील महत्वाचा दुवा असलेल्या कृषी विभागातील सुमारे ३० टक्के पद रिक्त आहेत. परिणामी या विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कामाचा दबाव असतानाच शेतकऱ्यांना योजनांचा लाभही मिळण्यात अडचणी येत आहेत. विधान परिषदेत गिरीशचंद्र व्यास यांनी यावर प्रश्न उपस्थित केल्यावर सरकारने ही पदभरती करण्यासाठी सकारात्मक असल्याचे म्हटले आहे.

Advertisement

कृषिमंत्री दादा भुसे यांनी विधान परिषदेत मंगळवारी सांगितले की, राज्यात कृषी विभागासाठी गट-अ ते गट-ड संवर्गातील एकूण २७ हजार ५०२ पदांचा आकृतिबंध मंजूर असून त्यापैकी १८ हजार ६२२ पदे भरलेली आहेत, तर ८ हजार ८८० पदे रिक्त आहेत. विभागातील रिक्त पदे लवकरात लवकर भरण्यात येतील.

Advertisement

तांत्रिक संवर्गाची २० हजार १८१ पदे मंजूर असून त्यापैकी १४ हजार ८०९ पदे भरलेली आहेत, तर ५ हजार ३७२ पदे रिक्त आहेत. १६ मे २०१८ शासन निर्णयानुसार तांत्रिक संवर्गातील १०० टक्के पदभरतीस मान्यता देण्यात आली होती. त्यानुसार पदे भरण्याची प्रक्रिया सुरू आहे, असेही भुसे यांनी स्पष्ट केले आहे.

Advertisement

भुसे म्हणाले की, वित्त विभागाच्या ४ मे २०२० रोजीच्या शासन निर्णयानुसार निर्बंध असल्याने तूर्तास ही पदे भरता आली नाहीत. या आदेशात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय संवर्गातील पदे भरण्यावर मर्यादा आहेत. मात्र, लवकरच करोना नियंत्रित येईल. त्यानंतर पदभरती केली जाईल.

Advertisement

संपादन : सचिन पाटील

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply