Take a fresh look at your lifestyle.

आणि म्हणून ‘५ कोटीवाली शांताबाई आजी’ अडचणीत; परळी येथे पोलिसांमध्ये तक्रार..!

बीड / औरंगाबाद :

Advertisement

टिकटॉक स्टार पूजा चव्हाण यांच्या आत्महत्या प्रकरणामध्ये दररोज नवनव्या बातम्या येत आहेत. आता माजी वनमंत्री संजय राठोड यांनी मृत पूजाच्या कुटुंबियांना शांत राहण्यासाठी तब्बल ५ कोटी रुपये दिल्याचा सनसनाटी दावा पूजाच्या कथित चुलत आजी शांताबाई राठोड यांनी केला होता. आता आजी राठोड यांच्याविरोधात परळी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisement

धारावती तांडा येथील शांताबाई राठोड या महिलेने पूजा चव्हाणच्या पालकांवर गंभीर आरोप केल्याने राज्यभरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचे गूढ आणि संशय आणखीच वाढण्यास यामुळे मदत झाली होती. मंगळवारी पूजाचे वडील लहू चव्हाण यांनी परळी शहर पोलिस ठाण्यात जाऊन आजीच्या विरोधात तक्रार दिली आहे.

Advertisement

शांताबाई या आमच्या नातेवाईक नसून त्या नाहक बदनामी करीत असल्याचा दावा लहू चव्हाण यांनी केला आहे. तक्रारीनुसार भादविं ५०० व ५००१ प्रमाणे अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisement

दरम्यान, पूजा चव्हाण यांच्या आत्महत्या प्रकरणाची वानवडी पोलिसांनी चौकशी करावी. त्यानंतर संबंधितांवर गुन्हा दाखल करावा. याबाबतचे आदेश न्यायालयाने पोलिसांना द्यावेत, अशी मागणी करणारा खटला लष्कर न्यायालयात दाखल झाला आहे.

Advertisement

संपादन : सचिन पाटील

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply