पुणे :
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाचा तिढा दिवसेंदिवस आणखी वाढत आहे. पुणे पोलिसांनी तक्रार अर्जही घेतले नसल्याचे आरोप करणाऱ्या पूजाच्या आजी शांताबाई राठोड यांनी माजी वनमंत्री संजय राठोड यांनी ५ कोटी रुपये देऊन पूजा चव्हाण हिच्या आई-वडीलांचे तोंड बंद केल्याचा धक्कादायक दावा केला आहे.
तसेच मिळालेले पैसे त्यांनी कुठे लपवून ठेवले हेही व्हिडीओमध्ये सांगताना त्यावरून कुटुंबियांचे भांडण चालू असल्याचा दावाही केले आहे. त्यामुळे वेगवेगळे दावे-प्रतिदावे आणि बातम्या येत असल्याने याप्रकरणी आणखी गोंधळ वाढला आहे.
पूजाच्या आत्महत्या प्रकरणामुळे वनमंत्री संजय राठोड यांना राजीनामा देऊन पायउतार व्हावे लागले आहे. तर, तसेच बंजारा समाजाने चव्हाण यांच्या बाजूने यात उडी घेतली आहे. भाजपने या प्रकाराद्वारे महाविकास आघाडीची कोंडी केली आहे.
दरम्यान, शांताबाई राठोड या आजीने म्हटले आहे की, आई-वडिलांना पैशासमोर स्वतःच्या मुलीची किंमत वाटत नाही, तर मी चुलत आजी कुठली कोण? पूजाच्या आई वडीलांनी समाजाची दिशाभूल तर केलीच आता मुख्यमंत्र्यांची ही दिशाभूल करत आहेत.
संजय राठोड यांनी पूजाच्या आई-वडिलांना पाच कोटी रुपये देऊन त्यांचा आवाज बंद केला आहे, त्यामुळे ते संजय राठोड यांच्या विरोधात कधीही आवाज उठवणार नाहीत. आमची मुलगी आजारी होती आणि त्यानेच ती मेली असेच ते म्हणतील. हे पाच कोटी रुपये त्यांनी जमिनीत पुरून ठेवले आहेत. यावरून आता जावया-जावयात भांडण सुरू आहेत. पैशांपुढे पूजा सोबत झालेला घातपात दडपण्याचा प्रयत्न सुरू आहे, असाही आरोप शांताबाई यांनी केला आहे.
दरम्यान, या मृत्यूप्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई व आजी शांताबाई वानवडी पोलीस ठाण्यात गेल्यावर पोलिसांनी त्याची तक्रारही नोंदवून घेतल्याचे म्हटलेले आहे. पोलीस ठाण्याच्या प्रवेशद्वारावर धरणे आंदोलन केल्यावर पोलिसांनी त्यांना शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी नोटीस बजावली होती.
शांताबाई राठोड खोटे बोलत आहेत. त्यांनी बदनामी सुरु केली असून आरोपांमध्ये तथ्य नाही. त्यांनी पुरावे द्यावेत. बिनबुडाचे आरोप करु नयेत, असेही पूजाचे वडील लहु चव्हाण यांनी म्हटलेले आहे.
संपादन : सचिन पाटील
कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com
| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल |
मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com
- कोविड ज्ञान : ऑक्सिजनचा वापर आणि करोना कोणत्या ठिकाणी पसरतो, याची माहिती नक्की वाचा
- म्हणून रात्री झोपण्याअगोदर प्यायचा असतो गुळ; पहा कोणते फायदे होतात या सध्या गोष्टीमुळे
- या 5 गोष्टी खा आणि उन्हाळ्यात वजन कमी करा; ‘चरबीवान’ मंडळींसाठी आहे ही खास माहिती
- IPL 2021 : दिल्ली कॅपिटल Vs पंजाब किंग्जचे संघ भिडणार; पहा काय असेल प्लेइंग इलेव्हनची लिस्ट
- IPL 2021 : मॉर्गनसमोर असेल कोहलीचे आव्हान; पहा संभाव्य प्लेइंग इलेव्हन कोण ते