Take a fresh look at your lifestyle.

म्हणून अदानी-अंबानींच्या संपत्तीत इतकी दमदार वाढ; पहा कोण आहे आघाडीवर..!

मुंबई :

Advertisement

देशभरात सध्या रिलायन्स ग्रुप आणि अदानी ग्रुप या दोन्हींची घोडदौड जोमात आहे. अशावेळी नवनवे प्रयोग राबवून भारतात आणि जगभरात आपल्या ग्रुपची ताकद वाढवण्यात हे दोन्हीही ग्रुप मागे नाहीत. त्यामुळेच वर्षभरात या दोन्ही ग्रुपने दमदार वाढ नोंदवली आहे.

Advertisement

कोरोना महामारीमुळे फ़क़्त भारत देश नाही, तर जगभरात सामान्य जनता आणि केंद्र व राज्य सरकारला आर्थिक संकटांचा सामना करावा लागत आहे. त्याचवेळी शेअर बाजार आणि कॉर्पोरेट जगतामध्ये भांडवलदारांच्या संपत्तीत दमदार वाढ झाली आहे. त्यात सुप्रसिद्ध उद्योजक मुकेश अंबानी आणि गौतम अदानी आघाडीवर आहेत.

Advertisement

हुरुन ग्लोबल रिच लिस्ट 2021 यानुसार वर्षभरात फ़क़्त भारतात 40 अब्जाधिशांची वाढ होऊन ही संख्या 177 वर पोहचली आहे. यातही करोना कालावधी असून ग्रोथ नोंदवण्यात कॉर्पोरेट जगातला यश मिळाले आहे.

Advertisement

अंबानीकडे 6.1 लाख कोटी रुपये (83 बिलियन डॉलर) ची संपत्ती असून जगातील सर्वात श्रीमंत लोकांच्या या वार्षिक यादीमध्ये ते 8 व्या क्रमांकावर आहेत. तर, गुजरातमधील व्यापारी गौतम अडानी यांची संपत्ती तब्बल दुप्पट झाली आहे.

Advertisement

2020 मध्ये अदानी यांच्या संपत्तीत दुपटीने वाढ होऊन 2.34 लाख कोटी (32 बिलियन डॉलर) झाल्याचे अहवालात म्हटले आहे. जगातील सर्वात श्रीमंतांच्या यादीत अदानी हे 45 व्या स्थानी, तर भारताच्या यादीत दुसऱ्या स्थानावर आहेत. HCL चे शिव नडार हे या भारतीयांच्या यादीत तिसऱ्या स्थानावर आहेत. तर, आर्सेलर मित्तल व सायरस पूनावाला हे अनुक्रमे चौथ्या आणि पाचव्या स्थानावर आहेत.

Advertisement

संपादन : सचिन पाटील

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply