Take a fresh look at your lifestyle.

म्हणून औरंगाबादेत निर्माण झाला तणाव; शिवसेनेचे नेते माजी आमदार झाले झटक्यात फरार..!

औरंगाबाद :

Advertisement

सध्या करोना आणि त्याच्या कारवाया याही देशभरात चर्चेत आहेत. वाढत्या करोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर सध्या देशभरात खबरदारी म्हणून मास्क घालण्याचे आवाहन आणि नियम लागू आहेत. अशावेळी याच मुद्द्यावरून शहरात तणाव निर्माण झाला. अखेरीस यातील माजी आमदार फरार झालेले आहेत.

Advertisement

विनामास्क मोकाट फिरणाऱ्यांवर कारवाईसाठी नियुक्त नागरी मित्र पथक शहरात काम करीत आहे. त्यावेळी माजी आमदार किशनचंद तनवाणी यांच्यासह कार्यकर्ते पथकावर कारवाई अजिबात न करण्याचा दबाव टाकत होते. मास्क घालून नसल्याचे पाहून पथकाने कारवाईची कार्यवाही केली असतानाही त्यांनी असे केल्याने मग वाद वाढला.

Advertisement

तनवाणी यांच्यासह माजी नगरसेवक सुरेंद्र कुलकर्णी यांच्यात सोमवारी सायंकाळी गुलमंडी येथे वाद झाला. वादाचे रूपांतर हाणामारीत होऊन कुलकर्णी व अतिष जोजरे यांना अटक झाली. तर तनवाणी फरार झाले आहेत.

Advertisement

गुलमंडी परिसरात तक्रारदार देविदास लक्षम सुसर आणि त्यांचे माजी सैनिक नागरिक मित्र पथकासह गुलमंडी परिसरातील टिळकपथ रोडवर विना मास्क फिरणार्‍या लोकांवर ती कारवाई करत होते. त्यातून हा वाद झाला. तनवाणी, कुलकर्णी व जोजरे यांनी कारवाई न करण्याचे म्हटल्याने वाद निर्माण झाला.

Advertisement

आरोपींनी सुसर आणि त्यांच्या साथीदारांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली असे तक्रारीत म्हटले आहे. तर, तनवाणी यांनी पथकातील कर्मचाऱ्यांची भाषाही दादागिरीची असून ते तोंड बघून कारवाई करीत असल्याचा आरोप केला आहे.

Advertisement

मनपाचा ध्वज आणि अंबर दिवा लावलेल्या चारचाकीतून हे पथक कसे फिरते, असाही प्रश्न व्यापाऱ्यांणी केला आहे. हातगाडीचालक, व्यापाऱ्यांकडून पावती न देता दंडवसुली होत असल्याने अनेकांनी आरोप केले आहेत.

Advertisement

संपादन : सचिन पाटील

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply