Take a fresh look at your lifestyle.

मग ‘ते’ ३५ हजार कोटी गेले कुठे; पहा चव्हाणांनी मोदी सरकारच्या निधीवर नेमके काय म्हटलेय ते

पुणे :

Advertisement

केंद्र सरकारने अर्थसंकल्पात कोविड लसीकरणासाठी ३५ हजार कोटी रुपयांची भरीव तरतूद केली होती. लोकसभेत भाजप नेत्यांनी १.६५ कोटी लशींचे डोस विकत घेतल्याचे सांगितले आहे. एका डोसची किंमत २१० रुपये आहे. राखीव निधीत देशातील सुमारे ७५ कोटी नागरिकांना मोफत लस देता येऊ शकते. तरीही सरकारकडून सामान्य नागरिकांच्या खिशाला कात्री लावली जात असल्याची टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. 

Advertisement

देशभरातील ४५ ते ५९ वर्षांपर्यंतच्या व्याधीग्रस्त व ६० वर्षांपेक्षा जास्त वय असणाऱ्या व्यक्तींना लस देण्यास १ मार्चपासून सुरुवात झाली आहे. लसीसाठी सामान्य नागरिकांकडून २५० रुपये आकारले जात आहेत. लसीसाठी नागरिकांकडून पैसे आकारण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या निर्णयावर चव्हाण यांनी प्रश्न उपस्थित केला आहे.

Advertisement

अमेरिका, कॅनडा आणि इंग्लंड यासारख्या मोठ्या देशांनी नागरिकांना मोफत लस पुरवली आहे. त्यासाठी तेथील प्रशासनाने विमा योजनांचा खुबीने वापर केला आहे. भारतानेही प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेतील सर्व लाभार्थ्यांना कोविड लस मोफत उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे.  

Advertisement

संपादन : महादेव गवळी

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply