Take a fresh look at your lifestyle.

..आणि ‘त्या’ नेत्यांसह केंद्रप्रमुखांचा अर्थपूर्ण प्रयत्न फसला; शिक्षकांच्या सतर्कतेचा परिणाम..!

अहमदनगर :

Advertisement

शिक्षण विभाग असो की आरोग्य विभाग, सगळीकडे वस्तू खरेदी म्हणजे भ्रष्टाचाराचे कुरण. मात्र, असाच प्रयत्न अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर येथे शिक्षकांच्या सतर्कतेमुळे फसला आहे. त्यामुळे एका नेत्यासह केंद्रप्रमुखांना मोठा झटका बसला आहे.

Advertisement

याप्रकरणी दिव्य मराठीने बातमी प्रसिद्ध केली आहे. त्यात म्हटले आहे की, जिल्हा परिषदेच्याशाळांमधील अनुसूचित जाती, जमातीच्या व दुर्बल घटकांतील ९५४७ विद्यार्थ्यांसाठी निकृष्ट गणवेश खरेदी करण्याचा पंचायत समिती सदस्य दिनेश बाबर व विविध केंद्रप्रमुखांचा प्रयत्न शिक्षक संघटनांच्या दबावामुळे फसला आहे.

Advertisement

गटशिक्षणाधिकारी बुगे साहेब यांनी आदेशात म्हतेल आहे की, व्यवस्थापन समितीच्या सल्ल्याने मुख्याध्यापकांनी दर्जेदार गणवेश खरेदी करून विद्यार्थ्यांना वाटावे. याकडे शिक्षक संघटनांच्या समन्वय समितीने लक्ष वेधले होते. विशिष्ट दुकानातून गणवेश खरेदी करण्यास विरोध केल्यानंतर व्यवस्थापन समितीच्या सल्ल्याने मुख्याध्यापकांनी दर्जेदार गणवेश खरेदी करून विद्यार्थ्यांना वाटण्याच्या या आदेशाचे अनेकांनी स्वागत केले आहे.

Advertisement

यामध्ये असे घडले होते की, गणवेश खरेदीसाठी प्रत्येकी ३०० रुपयांप्रमाणे रक्कम शाळा व्यवस्थापन समित्यांकडे वर्ग करण्यात आली आहे. शाळा व्यवस्थापन समितीच्या सहकार्याने मुख्याध्यापकांनी दर्जेदार गणवेश खरेदी करणे अपेक्षित आहे. बाबर यांनी विविध केंद्रप्रमुखांशी संगनमत करुन मुख्याध्यापकांनी विशिष्ट दुकानातून गणवेश खरेदी करण्याचा फतवा काढला. केंद्रप्रमुखांना गणवेश खरेदीबाबत अधिकार नसताना मुख्याध्यापकांच्या बैठका घेत विशिष्ट दुकानातून गणवेश खरेदी करण्याचे आदेश मुख्याध्यापकांना दिले. 

Advertisement

असा अन्याय्य फतवा मान्य न झाल्याने मग शिक्षकांनी याच्या विरोधात थेट पंचायत समितीचे दार ठोठावले. खराब गणवेशांमुळे पालक, ग्रामस्थांच्या रोषाला सामोरे जावे लागेल याची जाणीव झाल्याने मुख्याध्यापक, शिक्षकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली. आवाज उठवण्यासाठी शिक्षकांच्या विविध संघटना एकत्र आल्या. बाबर यांचा हस्तक्षेप थांबवण्याची व केंद्रप्रमुखांना समज देण्याची मागणी करण्यात आली होती. त्याचीच दखल प्रशासनाने घेतली आहे.

Advertisement

संपादन : सचिन पाटील

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply