Take a fresh look at your lifestyle.

आणि त्यांनी थेट डॉक्टरांच्या नावानेच मागितले कर्ज; पहा कुठे उघडकीस आला लाखोंचा कर्जघोटाळा..!

औरंगाबाद / अहमदनगर :

Advertisement

बँका वा वित्तसंस्था परतफेड करणाऱ्यांना ठेंगा आणि ठगांना लाल गालीचा अंथरून कर्जपुरवठा करीत असल्याचे वेळोवेळी उघडकीस आलेले आहे. मात्र, आता अहमदनगर येथील एका प्रकरणात चक्क बँकिंग अधिकाऱ्यांच्या सतर्कतेमुळे वित्तसंस्थेची 50 लाख रुपयांची फसवणूक होण्याचे टळले आहे.

Advertisement

हे वाचून अजिबात हुरळून जाऊ नका. आपल्या कोणत्याही ‘जबाबदार’ सरकारी बँक अधिकाऱ्यांची ही कमाल नाही. ही कमाल घडली आहे बजाज फायनान्सच्या अधिकाऱ्यांच्या सतर्कतेमुळे. याप्रकरणी पोलिसांनी तातडीने दखल घेऊन तेजस प्रमाेद माेगले (सिडकाे महानगर, अाैरंगाबाद), शुभम रमेश नंदगवळी (गुलमंडी, अाैरंगाबाद), अमाेल सतीश साेनी (बसवंतनगर, देवळाई, अाैरंगाबाद) व सतीश बापू खांदवे (वाकाेडी, नगर) या आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत.

Advertisement

अहमदनगर शहरातील प्रतिष्ठित डाॅक्टरांच्या नावाने बनावट इ-मेल अायडी व कागदपत्रे सादर करून बजाज फायनान्सकडे तब्बल 50 लाखांचे कर्ज मागणारी टाेळी पाेलिसांनी गजाअाड केली आहे. सायबर पाेलिसांनी ही कारवाई केली. अाैरंगाबादमधून तिघांना, तर नगरमध्ये एकाला अटक केल्यानंतर न्यायालयासमोर उभे करण्यात आले. न्यायालयाने अाराेपींना दाेन दिवसांची पाेलिस काेठडी सुनावलेली आहे.

Advertisement

सुरूवातीला कागदपत्रांची शहानिशा करताना कागदपत्रे हुबेहूब असल्याने कंपनीने ५० लाखांचे कर्ज मंजूरही केले. अाेटीपी क्रमांक मिळाल्यानंतर पैसे वर्ग करण्यापूर्वी सर्व शहानिशा करण्यासाठी अधिकाऱ्याने संबंधित माेबाइल क्रमांकावर फाेन केला होता. त्यावेळी फाेनवर बाेलताना अाराेपी गडबडले. शंका अाल्याने कंपनीच्या अधिकाऱ्याने कर्जाची रक्कम खात्यावर न टाकता फिजिकल व्हेरीफिकेशन करण्याचा निर्णय घेतला. संबंधित डाॅक्टरांकडे विचारपूस केल्यानंतर हा प्रकार उघडकीस अाला.

Advertisement

सायबर पाेलिस ठाण्याचे निरीक्षक मधुकर साळवे, हेड काॅन्स्टेबल याेगेश गाेसावी, उमेश खेडकर, मल्लिकार्जुन बनकर, दिगंबर कारखिले, राहुल हुसळे, िवशाल अमते, अभिजित अरकल, राहुल गुंडू, अरुण सांगळे, गणेश पाटील, सम्राट गायकवाड, वासुदेव शेलार, सविता खताळ, स्मिता भागवत, पूजा भांगरे, दीपाली घाेडके, उमिला चेके, प्रीतम गायकवाड, सीमा भांबरे यांच्या टीमने ही कारवाई केली.

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement
Advertisement

Leave a Reply