Take a fresh look at your lifestyle.

म्हणून अजित पवारांनी दिली वीजबिल वसुलीस स्थगिती; पहा कोणापुढे वरमले ठाकरे सरकार

मुंबई :

Advertisement

करोनामुळे राज्याची आर्थिक स्थिती बिकट झाल्यानंतर महाविकास आघाडी सरकारविरुध्द जनतेमध्ये तीव्र असंतोष आहे. अशावेळी शेतकरी, गरीब, सर्वसामान्य नागरिकांना वीज बिलाचे पैसे भरण्याची विवंचना आहे. त्यामुळे सरकारने पहिजे तर चार-पाच हजार कोटी रुपये कर्ज काढावे, पण शेतकऱ्यांची वीज बिले माफ करावीत, अशी आग्रही मागणी विधान परिषदेत विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी सरकारकडे केली होती. त्यांनतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सक्तीच्या वीज बिल वसुलीस स्थगिती दिली असे दरेकर यांनी म्हटले आहे.

Advertisement

आज विधानपरिषदेत प्रश्नोत्तराचा तास संपल्यानंतर प्रविण दरेकर यांनी स्थगन प्रस्तावाच्या सूचनेवर बोलताना सरकारला अक्षरश: धारेवर धरलं.  मी सोलापूर, नांदेडला गेलो, चिफ इंजिनिअर सर्वांना भेटलो.  या सरकारचा तुघलकी कारभार समोर आला. दरेकरांनी सभागृहात वजिराबाद, नांदेडच्या पी.एम.महाजन यांना ११ लाख ९० हजाराचे बिल आल्याचे तसेच नांदेडच्याच रामसिंग परमसिंग यांनाही असेच बिल आल्याचे सांगून बिलं सभागृहात दाखवली. बिल्डरांना ६ ते ७ हजार कोटी रुपयांचा प्रिमियम माफ करणारे सरकार, दारु दुकानदारांची फी माफ करणारे सरकार महसूल मिळत नाही, हे कारण पुढे करीत आहे.  त्याऐवजी शेतकऱ्यांसाठी चार-पाच हजार कोटी लागणार असतील तर सरकार हा धाडसी निर्णय का घेत नाही, असा जाबही त्यांनी सरकारचा विचारला.  

Advertisement

ऊर्जा मंत्र्यांनी ३०० युनिटपर्यंत मोफत वीज देतो,  करोनामध्ये वीज बिल कमी करतो, म्हणून सांगितलं.  ते तर केलं नाहीच पण अवाजवी बिलं दिल्यानंतर कोणतीही नोटीस न देता वीज कापली जात आहे, सोलापूर, पंढरपूरच्या दौऱ्यात तर  डी.पी.खाली उतरवून ठेवलेले दिसले.  दोन लोक थकबाकीदार असतील तर उरलेल्या लोकांचा काय गुन्हा आहे, काही गावे अंधारात आहेत, राज्याची क्षमता आहे, चार-पाच हजार कोटी रुपयांचे आणखी कर्ज घ्या आणि शेतकऱ्यांचे वीज बिल माफ करा, ते शक्य नसेल तर बिल तपासल्याशिवाय, दुरुस्त करुन दिल्याशिवाय वीज कापू नये, किमान एक महिना तरी वीज कापू नये, अशी आग्रही मागणी देखील त्यांनी केली.

Advertisement

दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हा विषय ऊर्जा खात्याचा आहे, त्यावर सभागृहात चर्चा होऊन निर्णय होत नाही तोवर राज्यातील घरगुती वीज ग्राहक व शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडले जाणार नाही, अशी ग्वाही सभागृहाला दिली आहे.

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply