Take a fresh look at your lifestyle.

फडणवीसांच्या ‘जलयुक्त’ची चौकशी जोरात; पहा कुठे होत आहे आढावा बैठक

अहमदनगर :

Advertisement

सध्याचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात धुमधडाक्यात राबवलेल्या जलयुक्त शिवार अभियानाची चौकशी जोरात सुरू झालेली आहे. महाविकास आघाडीच्या कार्यकाळात चौकशीला वेग आल्याने याकडे अवघ्या राज्याचे लक्ष लागले आहे.

Advertisement

जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत अभियानाच्या कालावधीत झालेल्या मृद व जलसंधारण कामांची खुली चौकशी करण्यासाठी सेवानिवृत्त अपर मुख्य सचिव विजयकुमार यांच्या अध्यक्षतेखाली खुली चौकशी समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीमार्फत अहमदनगर जिल्हयातील जलयुक्त शिवार अभियान संदर्भातील तक्रारीचा आढावा व तक्रारदारांना समक्ष निवेदन मांडण्यासाठी दिनांक 3 मार्च, 2021 रोजी सकाळी 11.30 वाजता नियोजन भवन (जिल्हाधिकारी कार्यालय, अहमदनगर) येथे सभा आयोजित करण्यात आलेली आहे.

Advertisement

जलयुक्त शिवार अभियान संदर्भातील दिनांक 31 मार्च 2020 पूर्वी सादर केलेल्या तक्रारी संदर्भात तक्रारदारांनी आपले निवेदन मांडण्यासाठी आवश्यक त्या कागदपत्रांसह समक्ष उपस्थित रहावे. असे आवाहन सदस्य सचिव जिल्हास्तरीय जलयुक्त शिवार अभियान समिती तथा जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी शिवाजीराव जगताप यांनी केले आहे

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply