Take a fresh look at your lifestyle.

आई..गं.. हेडफोनचा बसतोय असाही फटका; कोट्यावधी लोकांवर झालेत ‘हे’ दुष्परिणाम.!

मोबाईलचा हा जमाना आहे. अनेकांना फ़क़्त फोन करण्यासाठी नाही, तर मोबाईल हे मनोरंजनाचे महत्वाचे साधन असल्याचे पटले आहे. मात्र, मनोरंजन करण्यासह त्यासाठी वेळ घालून आपल्यावर हेडफोनचे जे दुष्परिणाम होतात तेही आपणास माहिती आहेत का?

Advertisement

नाहीत ना? अनेकदा तंत्रज्ञान हे दुधारी हत्यार बनलेले असते. याद्वारे जसे फायदे होतात, तसेच तोटेही. असाच प्रकार मोबाईल आणि अक्सेसरीज याबाबत घडत आहेत. अनेकांना याचे दुष्परिणाम दिसायला काही कालावधी लागणार आहे. तर, काहींना याचे दुष्परिणाम दिसायला सुरुवात झालेलीही आहे. त्यातलाच एक प्रकार म्हाणजे हेडफोन.

Advertisement

३ मार्च हा दिवस जागतिक श्रवण दिन आहे. त्यानिमित्ताने आपण याचे काही मुद्दे पाहणार आहोत. हे मुद्दे काळजीपूर्वक वाचा आणि त्याद्वारे आपल्या लाइफस्टाइलमध्ये वेगळा आणि शरीरास सकारात्मक वाटणारा बदल करून घ्यायचा प्रयत्न करा. जर हे योग्य वाटले तर आपल्या प्रियजनांना शेअर करून दुष्परिणाम अधोरेखितही करा.

Advertisement

मोठ्या आवाजामुळे बहिरेपणाच्या समस्या वाढत आहेत. त्यामध्ये हेडफोन आणि डीजे या आधुनिक साधनांचा मोठा हातभार आहे. हेडफोन किंवा कुठेही आणि कशावरूनही सतत मोठ्या आवाजात ऐकल्यामुळे बहिरेपणाची समस्या येतात.

Advertisement

महिलांनी व गृहिणींनी ही महत्वाची माहिती काळजीपूर्वक वाचून आपल्या घरातील तरुण-तरुणी आणि चिमुरडे यांच्यावर मोबाईल आणि हेडफोनच्या वापराचे हे दुष्परिणाम लक्षात घेऊन याचा वापर योग्य पद्धतीने करण्यासाठीची काळजी घेण्यासाठी कुटुंबियांना प्रेरित करण्याची आवश्यकता आहे. मात्र, काही ठिकाणी गृहिणीच याची काळजी घेत नसल्याचे दुर्दैवाने पाहायला मिळत आहे.

Advertisement

सतत ८० डेसिबल्सपेक्षा अधिक तीव्रतेचा आवाज ऐकल्यामुळे आपल्या श्रवणशक्तीचा ऱ्हास होतो. हेडफोन ऐकताना आपण याचे अजिबात भान ठेवत नाहीत. त्यामुळे यापुढे याबाबतची काळजी घ्यावी.

Advertisement

मोबाईलवर हेडफोन जोडून काहीही ऐकत असताना आवाज वाढवल्यावर मोबाईल आपल्याला अलर्ट देतो की, आपण या क्षमतेच्यापेक्षा जास्त आवाजातील संगीत किंवा काहीही ऐकल्यास कानावर दुष्परिणाम होतील. त्या निर्देशाकडे अजिबात दुर्लक्ष करू नका.

Advertisement

देशभरातील सुमारे ६.३ टक्के भारतीय श्रवणशक्तीचा ऱ्हास झाल्याच्या समस्येचा सामना करीत आहेत. ध्वनी प्रदूषण, हेडफोनचा अति वापर यासह अपघात आणि इतरही घटकांमुळे भारताची ही लोकसंख्या कानाच्या विकाराचे बळी ठरली आहे.

Advertisement

कान-नाक-घसा डाॅक्टरांनी बहिरेपणा आणि त्यासंबंधित उपचार पध्दतीबाबत जनजागृतीसाठीचे प्रयत्न करण्याची गरज आहे. तसेच सर्वांनी एकमेकांना याबाबतची माहिती सांगणे हाच यावरील ठोस उपाय आहे.

Advertisement

संपादन : माधुरी सचिन चोभे     

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply