Take a fresh look at your lifestyle.

पूजाप्रकरणी कोटींचे दावे; आरोप-प्रत्यारोप आणि गोंधळात गोंधळ..!

सोशल मिडीयामध्ये एक प्रभावी ओळख प्रस्थापित करून पूजा चव्हाण हिने सामाजिक-राजकीय क्षेत्रात पदार्पण केले होते. मात्र, याच तरुणीला आत्महत्येचा टोकाचा निर्णय का घ्यावा लागला याचे कोडे अवघ्या महाराष्ट्राला पडले आहे. त्यातही आता वेगवेगळे दावे-प्रतिदावे आणि बातम्या येत असल्याने याप्रकरणी गोंधळात आणखी गोंधळ वाढला आहे.

Advertisement

पूजाच्या आत्महत्या प्रकरणामुळे महाविकास आघाडीच्या टीमची पहिली विकेट पडली आहे. याप्रकरणी वनमंत्री संजय राठोड यांना राजीनामा देऊन पायउतार व्हावे लागले आहे. विरोधी पक्ष असलेल्या भाजपने यानिमित्ताने शिवसेवेला कोंडीत पकडले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना यामुळे मोठ्या राजकीय दबावाचा सामना करावा लागलेला आहे.

Advertisement

तसेच बंजारा समाजाने चव्हाण यांच्या बाजूने यात उडी घेतली आहे. तर, भाजपने याप्रकरणी पुणे पोलिसांच्या भूमिकेबद्दल उघड भूमिका घेतली आहे. त्यातच आता पूजाचे आई-वडील याप्रकरणी शांत असताना तिच्या चुलत आजीने उडी घेऊन आणखी चर्चेला मुद्दे दिले आहेत.

Advertisement

शांताबाई राठोड या आजीने म्हटले आहे की, माजी वनमंत्री संजय राठोड यांनी ५ कोटी रुपये देऊन पूजा चव्हाण हिच्या आई-वडीलांचे तोंड बंद केले आहे. तर, शांताबाई राठोड खोटे बोलत आहेत. त्यांनी बदनामी सुरु केली असून आरोपांमध्ये तथ्य नाही. त्यांनी पुरावे द्यावेत. बिनबुडाचे आरोप करु नयेत, असे पूजाचे वडील लहु चव्हाण यांनी म्हटलेले आहे.

Advertisement

आजीने दावा केला आहे की, आई-वडिलांना पैशासमोर स्वतःच्या मुलीची किंमत वाटत नाही, तर मी चुलत आजी कुठली कोण? पूजाच्या आई वडीलांनी समाजाची दिशाभूल तर केलीच आता मुख्यमंत्र्यांची ही दिशाभूल करत आहेत. संजय राठोड यांनी पूजाच्या आई-वडिलांना पाच कोटी रुपये देऊन त्यांचा आवाज बंद केला आहे, त्यामुळे ते संजय राठोड यांच्या विरोधात कधीही आवाज उठवणार नाहीत. आमची मुलगी आजारी होती आणि त्यानेच ती मेली असेच ते म्हणतील. हे पाच कोटी रुपये त्यांनी जमिनीत पुरून ठेवले आहेत. यावरून आता जावया-जावयात भांडण सुरू आहेत. पैशांपुढे पूजा सोबत झालेला घातपात दडपण्याचा प्रयत्न सुरू आहे.

Advertisement

संपादन : सचिन पाटील    

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply