Take a fresh look at your lifestyle.

विधानपरिषदेच्या कामकाजाला ‘अशी’ झाली सुरुवात; वाचून नक्कीच वाटेल अभिमान

मुंबई :

Advertisement

विधानपरिषदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कामकाजाला वंदे मातरम‌्ने सुरुवात झाली. यावेळी सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, संसदीय कार्यमंत्री अनिल परब, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, वित्त व गृहराज्यमंत्री (ग्रामीण) शंभुराज देसाई, विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यासह विधानपरिषदेतील सदस्य उपस्थित होते.

Advertisement

विदर्भ मराठवाड्याच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही. अधिकचा निधी देऊ. विदर्भ व मराठवाडा विकास मंडळ झाले पाहिजे या विचाराचे हे सरकार असल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत दिली.

Advertisement

सदस्य सुधीर मुनगंटीवार यांनी या संदर्भात मुद्दा मांडला होता. त्यावर बोलताना अर्थमंत्री श्री.पवार म्हणाले की, विदर्भ मराठवाडा विकास मंडळ स्थापन करुन या भागाचा विकास करण्याची आमची भूमिका आहे. जी विकास मंडळे आहेत ती गृहीत धरुन त्याप्रमाणे निधीचे वाटप करण्यात येईल. विकास मंडळ अस्तित्वात असल्यापासून ज्याप्रकारे निधीचे वाटप झाले त्याचप्रमाणे वाटप झाले पाहिजे. कुचराई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशाराही श्री.पवार यांनी यावेळी दिला.

Advertisement

संपादन : स्वप्नील पवार

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply