Take a fresh look at your lifestyle.

‘तिथे’ शरद पवारांचीच गरज; संजय राऊतांनी पुन्हा सांगितले

औरंगाबाद :

Advertisement

जयभीम फेस्टीव्हल मध्ये शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांची प्रकट मुलाखत झाली. यावेळी त्यांनी विविध विषयांवर भाषी भाष्य केले. यावेळी त्यांनी ‘ कॉंग्रेसच्या नेतृत्वाखालील युपीए आघाडीची आता फेररचना करण्याची गरज असून शरद पवार यांच्या सारख्या नेत्यांकडे युपीए आघाडीचे नेतृत्व देण्याची गरज आहे’, असे मत व्यक्त केले.

Advertisement

पुढे बोलताना ते म्हणाले की, आज युपीए आघाडीत काही पक्ष उरलेले असले तरी अन्य प्रादेशिक पक्ष कॉंग्रेसच्या नेतृत्वाखाली या आघाडीत काम करण्यास तयार नाहीत. त्यामुळे पवारांसारख्या नेत्यांकडे या आघाडीचे नेतृत्व दिल्यास या आघाडीची ताकद वाढण्यास मदत होऊ शकते.

Advertisement

यावेळी त्यांनी शिवसेनाप्रमुख आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून काही अपेक्षाही व्यक्त केल्या. ते म्हणाले की, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्लीत येऊन राष्ट्रीय स्तरावर राजकारण केले पाहिजे. अनेक प्रादेशिक पक्षांना आणि अन्य पक्षांनाही आता नवीन नेतृत्व हवे आहे. हे नेतृत्व आता महाराष्ट्रच देऊ शकतो.   

Advertisement

संपादन : स्वप्नील पवार

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply