Take a fresh look at your lifestyle.

आता ‘या’ मंत्र्यांची पत्नी चौकशीसाठी ईडी कार्यालयात हजर; वाचा, काय आहे प्रकरण

पुणे :

Advertisement

सध्या राज्याच्या आणि देशाच्या राजकीय पातळीवर विविध कारणांनी अस्थिर वातावरण आहे. अशातच आता एक मोठी बातमी समोर आली आहे. काँंग्रेस नेते आणि महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री विश्वजीत कदम यांच्या पत्नी स्वप्नाली कदम या चौकशीसाठी ईडी कार्यालयात हजर झाल्याचे समजत आहे.

Advertisement

मधल्या काळात राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे आणि शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांनाही ईडीने नोटिस पाठवली होती. त्यानंतर ईडीच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले होते.   

Advertisement

पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक अविनाश भोसले यांच्या स्वप्नाली या कन्या आहेत. तसेच  काँग्रेसचे दिवंगत नेते पतंगराव कदम यांच्या सूनबाई आहेत.

Advertisement

ईडीने या आठवड्यात अविनाश भोसले याच्या पुणे, मुंबई आणि कोल्हापूर येथील कार्यालयांवर छापा मारला. तसेच १० आणि १७ फेब्रुवारी रोजी समन्स बजावून त्याच दिवशी चौकशीसाठी ईडीच्या मुंबई कार्यालयात हजर राहण्यास सांगितले होते.

Advertisement

या प्रकरणात अविनाश भोसले व त्यांचा मुलगा अमित भोसले यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यानंतर पुढील सुनावणीत २४ फेब्रुवारीपर्यंत कारवाई करणार नाही, असे आश्वासन ईडीने उच्च न्यायालयाला दिले होते.

Advertisement

संपादन : स्वप्नील पवार

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply