Take a fresh look at your lifestyle.

पंकजा मुंडेंचा अजित पवारांना संतप्त सवाल; ‘त्या’ गोष्टीचा आणि १२ आमदारांचा काय सबंध आहे ?

बीड :

Advertisement

विदर्भ आणि मराठवाड्याच्या हिश्शाचा एकही रुपया कमी न करता निधीचे संपूर्ण वाटप करण्यात येईल. वैधानिक विकास महामंडळ अस्तित्वात असल्याचे गृहित धरुन निधीवाटपाच्या सूत्रानुसार अर्थसंकल्पात विदर्भ, मराठवाड्याला संपूर्ण निधी दिला जाईल. विधान परिषदेतील १२ आमदारांची नियुक्ती जाहीर होणेही तितकंच महत्वाचे असल्याचे सांगून या मुद्‌याकडेही उपमुख्यमंत्री अजित पवार सभागृहाचे लक्ष वेधले.

Advertisement

या पार्श्वभूमीवर अजित पवार यांच्या या विधानाचा भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. अजितदादा पवार जर ऑन रेकोर्ड बोलले असतील तर हे खरच दुर्दैवी आहे. मराठवाड्याचा विकास आणि ते १२ आमदारांचा काय सबंध आहे ? असा सवाल पंकजा मुंडे यांनी केला आहे.

Advertisement

आम्ही विकास महामंडळ स्थापन करू, याबद्दल काही दुमत असल्याचे कारण नाही. बजेटमध्ये तसा निधीही देऊ मात्र जोपर्यंत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी बारा आमदारांच्या पत्रावर सही करत नाहीत. तोपर्यंत विदर्भ-मराठवाडा विकास मंडळ तयार करणार नाही, असा इशारा पवार यांनी विधानसभेत दिला.

Advertisement

संपादन : स्वप्नील पवार

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply