बीड :
पूजा चव्हाण (Pooja Chavan) मृत्यू प्रकरणामुळे चर्चेत आलेल्या आणि अनेक गंभीर आरोप झालेल्या वनमंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांनी अखेर राजीनामा दिला आहे. राठोड यांच्या राजीनाम्यासाठी भारतीय जनता पक्षानं गेल्या काही दिवसांपासून आक्रमक भूमिका घेतली होती. आता राठोड यांच्या राजीनाम्यानंतर सामाजिक न्याय मंत्री यांच्याविरोधात भाजप आक्रमक होताना दिसत आहे.
माजी मंत्री व भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनीही ‘ संजय राठोड यांनी जसा राजीनामा दिला तसा धनंजय मुंडेंनीही राजीनामा द्यावा’, अशी मागणी केली आहे.
लोकमत या वृत्तपत्राने दिलेल्या माहितीप्रमाणे, काल भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष व आमदार चंद्रकांत पाटील यांनीही हीच भूमिका घेतली होतो.
ते म्हणाले होते की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे प्रबोधनकार ठाकरे आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे वारसदार आहेत. त्यांनी यापूर्वीच ठाकरे बाणा दाखवायला हवा होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उशिरा का होईना, वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा घेतला त्याचे आम्ही स्वागत करतो. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांच्याप्रमाणे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यायला हवा.
संपादन : स्वप्नील पवार
कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com
| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल |
मो. 9503219649
ईमेल : krushirang@gmail.com
- कोविड ज्ञान : ऑक्सिजनचा वापर आणि करोना कोणत्या ठिकाणी पसरतो, याची माहिती नक्की वाचा
- म्हणून रात्री झोपण्याअगोदर प्यायचा असतो गुळ; पहा कोणते फायदे होतात या सध्या गोष्टीमुळे
- या 5 गोष्टी खा आणि उन्हाळ्यात वजन कमी करा; ‘चरबीवान’ मंडळींसाठी आहे ही खास माहिती
- IPL 2021 : दिल्ली कॅपिटल Vs पंजाब किंग्जचे संघ भिडणार; पहा काय असेल प्लेइंग इलेव्हनची लिस्ट
- IPL 2021 : मॉर्गनसमोर असेल कोहलीचे आव्हान; पहा संभाव्य प्लेइंग इलेव्हन कोण ते