Take a fresh look at your lifestyle.

‘असे’ मिळवा रक्तदाबावर नियंत्रण; वाचा, अत्यंत महत्वाची माहिती

रक्तदाब हा विशिष्ट जीवनशैलीमुळे निर्माण झालेला आजार आहे. गेल्या काही वर्षांत त्याचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढले आहे. म्हणूनच अति किंवा कमी रक्तदाब निष्पन्न झाल्यावर उपचार करण्यापेक्षा आधीच सजग होणे शहाणपणाचे आहे.

Advertisement

दिवसेंदिवस हृदयविकाराचे प्रमाण वाढते आहे. त्याचा महत्त्वाचा धोक्याचा घटक आहे अति रक्तदाब (Hypertension). दिवसेंदिवस अति रक्तदाबाचे प्रमाणसुद्धा वाढते आहे. तो फक्त वयस्कर व्यक्तींचा आजार राहिला नसून त्यांची पाळेमुळे तरुण पिढीमध्ये रुजली आहेत.
आजच्या धकाधकीच्या, स्पर्धात्मक, यांत्रिक युगात तणावाचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे तरुण पिढीमध्ये उच्च रक्तदाबाचे प्रमाण वाढत चालले आहे. उच्च रक्तदाब वेळीच नियंत्रणात आणला नाही तर अशा व्यक्तींना पुढे हृदयविकार किंवा इतर दुष्परिणाम होऊ शकतात.

Advertisement

आपल्याला रक्तदाब नियंत्रणात ठेवायचा असेल तर आपल्या दैनंदिन जीवनशैलीत काही बदल करणे गरजेचे आहे.

Advertisement

१) आहारात फळं आणि हिरव्या भाज्यांचं सेवन करणं गरजेचं आहे.

Advertisement

२) लो फॅट डेअरी उत्पादने, सुकामेवा, कडधान्यं यासारख्या पदार्थांचं सेवन करणं फायदेशीर ठरतं.

Advertisement

३) जेवणात मीठाचं प्रमाण कमी केल्यानेही उच्च रक्तदाबाची समस्या कमी होते. खाताना कधीही अन्नपदार्थांवरुन मीठ टाकू नये.

Advertisement

४) वजन वाढल्यानेही उच्च रक्तदाबाची समस्या होते. त्यामुळे कॉलेस्ट्रोल आणि मधुमेह वाढण्याची शक्यता असते.

Advertisement

५) दररोज ३० मिनिटं व्यायाम करणं उच्च रक्तदाबावर नियंत्रण मिळवण्यासाठी सर्वोत्तम उपाय आहे. या व्यायामात सातत्य हवे.

Advertisement

संपादन : स्वप्नील पवार

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply