गुंतवणुकीची सुवर्णसंधी : महिन्याच्या पाहिल्याच दिवशी सोन्याच्या दरात घसरण; वाचा, काय आहेत आजचे ताजे दर
दिल्ली :
गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात सातत्याने घसरण होत आहे. अशात आता सोन्याचे दर पडताना दिसत आहे. आता तुम्हाला सोने खरेदी करण्याची संधी चालून आली आहे कारण सोन्याचे भावात आजही घसरण झालेली आहे.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण २०२१-२२ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प काही दिवसांपूर्वी सादर केला. यात केंद्र सरकारने सोने आणि चांदीवरील कस्टम ड्यूटी कमी केली आहे. याचाच थेट परिणाम सोन्याच्या आणि चांदीच्या दरावर झाला असून सोन्याचांदीच्या दरात गेल्या आठवड्यापासून घसरण झाली आहे.
एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक (कमोडिटी) तपन पटेल म्हणाले की, जागतिक स्तरावर सोन्याच्या विक्रीनुसार दिल्लीतील 24 कॅरेट सोन्याचे स्पॉट किंमत 358 रुपयांनी घसरली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोने प्रति औंस 1,792 डॉलर आणि चांदी किंचित खाली 27.56 डॉलर प्रति औंसवर बंद झाली.
सोमवारी 10 ग्रॅम सोन्याची किंमत 48,910 वर पोहोचली आहे तर चांदीची किंमत 68,200 वर पोहोचली आहे.
संपादन : स्वप्नील पवार
कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com
| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल |
मो. 9503219649
ईमेल : krushirang@gmail.com
- कोविड ज्ञान : ऑक्सिजनचा वापर आणि करोना कोणत्या ठिकाणी पसरतो, याची माहिती नक्की वाचा
- म्हणून रात्री झोपण्याअगोदर प्यायचा असतो गुळ; पहा कोणते फायदे होतात या सध्या गोष्टीमुळे
- या 5 गोष्टी खा आणि उन्हाळ्यात वजन कमी करा; ‘चरबीवान’ मंडळींसाठी आहे ही खास माहिती
- IPL 2021 : दिल्ली कॅपिटल Vs पंजाब किंग्जचे संघ भिडणार; पहा काय असेल प्लेइंग इलेव्हनची लिस्ट
- IPL 2021 : मॉर्गनसमोर असेल कोहलीचे आव्हान; पहा संभाव्य प्लेइंग इलेव्हन कोण ते