Take a fresh look at your lifestyle.

सर्वसामन्यांच्या खिशावरील भार वाढला; पुन्हा एकदा घरगुती गॅसच्या दरात झाली ‘एवढी’ वाढ

अहमदनगर :

Advertisement

सध्या देशात पेट्रोल-डिझेलच्या किंमती झपाट्यानं वाढत आहेत. पेट्रोलनं तर अनेक ठिकाणी शंभरी पार केली आहे. त्यामुळे ग्राहकांच्या खिशावर मोठ्या प्रमाणात ताण पडतोय. असं असलं तरी दुसरीकडे पुन्हा एकदा ग्राहकांच्या खिशाला कात्री लागणार आहे. चार दिवसांमध्ये सरकारी कंपन्यांनी एलपीजी सिलिंडरच्या दरात पुम्हा एकदा वाढ केली आहे.

Advertisement

केंद्र सरकारच्या अखत्यारीतील पेट्रोलियम कंपन्यांनी सोमवारी पुन्हा एकदा घरगुती वापराचा गॅस सिलिंडरच्या दरात २५ रुपयांची वाढ केली. या दरवाढीने सिलिंडरची किंमत ८०० रुपयांवर गेली आहे. याआधी गेल्या आठवड्यात गुरुवारी सिलिंडर २५ रुपयांनी महागला होता.

Advertisement

दिल्लीत आता घरगुती गॅसचे दर ७९४ रूपयांवरून वाढून ८१९ रूपये इतके झाले आहेत. तर मुंबईत सिलिंडरचे नवे दर ८१९ रूपये, कोलकात्यात ८४५.५० रूपये आणि चेन्नईमध्ये नवे दर आता ८३५ रूपये झाले आहेत.

Advertisement

दरम्यान, डिसेंबरनंतर गॅस सिलिंडरच्या किमतीत झालेली ही सहावी दरवाढ आहे. सहा वेळा झालेल्या दरवाढीने गॅस १५० रुपयांनी महागला आहे. याआधी एप्रिल २०२० मध्ये सिलिंडरचा भाव ७८९.५० रुपयांपर्यंत वाढला होता. त्यानंतर पहिल्यांदाच सिलिंडरच्या किमतींनी उच्चांकी स्तर गाठला आहे.

Advertisement

संपादन : स्वप्नील पवार

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply