Take a fresh look at your lifestyle.

घुले- जगताप यांच्यात कोण ठरणार जिल्हा बँक अध्यक्षपदाचा मानकरी; बघा, कुणाची आहे चलती तर कुणाचा अनुभव येणार कामी

अहमदनगर :

Advertisement

अनेक नाट्यमय घडामोडीनंतर जिल्हा बँक निवडणुकीचे निकाल समोर आले. या निवडणुकीची चर्चा जोरदार होती. अगदी राज्यातील नेतेही या निवडणुकीकडे लक्ष ठेऊन होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या निवडणुकीत जातीने लक्ष घातले आणि सगळे राजकारण आपल्या पद्धतीने फिरवले. अखेर महाविकास आघाडी सरकारने या निवडणुकीत बाजी मारली.

Advertisement

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष पदासाठी येत्या शनिवारी सभा बोलविण्यात आलेली आहे. अध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठी इच्छुकांकडून गाठीभेटी घेतल्या जात आहेत. पडद्याआडून घडामोडी सुरु आहेत. 

Advertisement

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुणे येथे झालेल्या बैठकीमध्ये जगताप व घुले यांच्या नावाबाबत प्राथमिक चर्चा झाल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. आता जगताप किंवा घुले यांच्यापैकी कुणाच्या गळ्यात जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाची माळ पडणार, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

Advertisement

भाजपकडे 7 तर महाविकास आघाडीकडे 14 संचालक आहेत. आता जिल्हा बँकेत अध्यक्षपदासाठी मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. हा कार्यक्रम अंतर्गत पातळीवर होणार असला तरीही राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आपापल्या पद्धतीने फिल्डिंग लावली आहे.

Advertisement

राहुल जगताप यांचे पॉझिटिव्ह- निगेटिव्ह :-  

Advertisement
  1. जगताप  यांच्याकडे सध्या कोणतेही पद नाही. पक्षाला त्यांना ताकद देणे गरजेचे.
  2. विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांनी उमेदवारी केली नव्हती. श्रीगोंद्यात विधानसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचा पराभव झाला. या पार्श्वभूमीवर वरिष्ठ काय निर्णय घेतात, हे महत्त्वाचे
  3. जगताप यांना संधी असतानाही त्यांनी विधानसभेला ऐनवेळी पक्षाची उमेदवारी स्वीकारली नाही.

चंद्रशेखर घुले यांचे पॉझिटिव्ह- निगेटिव्ह :-  

Advertisement
  1. घुले पाटील यांच्याकडे अनुभवी संचालक पाहिले जाते. 
  2. मंत्री बाळासाहेब थोरात यांचे संबंध एकमेकांना मदत करणे असेच आहेत. त्यामुळे घुले थोरात यांच्यामार्फत आपले नाव पुढे करू शकतात.
  3. घुले यांच्या घरात सध्या जिल्हा परिषद अध्यक्षपद असल्याने त्यांना संधी मिळण्याची शक्यता कमी होऊ शकते.  

संपादन : स्वप्नील पवार

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply