अहमदनगर :
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर बदलत्या राजकीय परिस्थितीत नगरच्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक राज्यस्तरावर गाजली होती. नगर जिल्हा बँकेच्या निवडणूकीचे निकाल लागलेले आहेत. भाजपकडे 7 तर महाविकास आघाडीकडे 14 संचालक आहेत.
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीची सूत्रे मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे होती. तर भाजपकडून विखे गटाची एकाकी झुंज होती. यात शिवसेनेकडे फक्त एकच संचालकपद आलेले आहे. तेही मंत्री शंकरराव गडाख यांच्या रूपाने.
आता जिल्हा बँकेत अध्यक्षपद कुणाकडे असणार? याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीचे माजी आमदार राहुल जगताप हे इच्छुक आहेत. त्यांना जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाची संधी द्यावी, या मागणीसाठी श्रीगोंद्यातील राहुल जगताप यांचे शिष्टमंडळ येत्या मंगळवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेणार आहेत.
तर दुसर्या बाजूला घुले हेही शांतीत क्रांती करण्याचा विचार करून व्यवस्थित मोर्चेबांधणी करत आहेत. माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील यांच्याकडे अनुभवी संचालक म्हणून पाहिले जाते. याशिवाय मंत्री बाळासाहेब थोरात यांचे संबंध एकमेकांना मदत करणे असेच आहेत. त्यामुळे घुले थोरात यांच्यामार्फत आपले नाव पुढे करू शकतात.
एकूण परिस्थिती बघता जगताप यांना घुले कदाचित भारीच पडू शकतात. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुणे येथे झालेल्या बैठकीमध्ये जगताप व घुले यांच्या नावाबाबत प्राथमिक चर्चा झाल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.
संपादन : स्वप्नील पवार
कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com
| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल |
मो. 9503219649
ईमेल : krushirang@gmail.com
- एलआयसी कर्मचाऱ्यांची चांदी; घसघशीत पगारवाढ, सोबत ‘इतका’ ‘स्पेशल अलाउन्स’..!
- इन्शुरन्स विकत घेताना घ्या काळजी; नाहीतर भविष्यात बसू शकतो ‘तसा’ही भुर्दंड..!
- घर सजावट आणि आरोग्य : ‘त्या’ चार झाडांची रोपे देतील ‘सुकून की निंद’..!
- NTPC मध्ये नोकरीची संधी; पहा काय आहेत नियम आणि पात्रतेच्या अटी
- मोदी सरकारने घेतले ‘ते’ महत्वाचे निर्णय; करणार ऑक्सिजन व रुग्णांच्या सोयीसाठीची तरतूद