Take a fresh look at your lifestyle.

जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदासाठी ‘या’ उमेदवाराने लावली फिल्डिंग; ‘अशी’ केलीय मोर्चेबांधणी

अहमदनगर :

Advertisement

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर बदलत्या राजकीय परिस्थितीत नगरच्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक राज्यस्तरावर गाजली होती. नगर जिल्हा बँकेच्या निवडणूकीचे निकाल लागलेले आहेत. भाजपकडे 7 तर महाविकास आघाडीकडे 14 संचालक आहेत.

Advertisement

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीची सूत्रे मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे होती. तर भाजपकडून विखे गटाची एकाकी झुंज होती. यात शिवसेनेकडे फक्त एकच संचालकपद आलेले आहे. तेही मंत्री शंकरराव गडाख यांच्या रूपाने.   

Advertisement

आता जिल्हा बँकेत अध्यक्षपद कुणाकडे असणार? याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस ९ जागा असल्याने त्यांच्याकडे अध्यक्षपद राहणार, हे दिसतच आहे. मात्र आता राष्ट्रवादीतूनही इच्छुकांची भाऊगर्दी वाढत आहे.

Advertisement

पक्षीय पातळीवर माजी आमदार चंद्रशेखर घुले, राहुल जगताप, आमदार आशुतोष काळे यांची नावे चर्चेत आहेत. मात्र घुले कुटुंबाकडे आधीच जिल्हा परिषद अध्यक्षपद असताना त्यांचा विचार किती होतो, हे पाहणे महत्वाचे आहे.

Advertisement

आमदार आशुतोष काळे यांचे नाव पक्षीय पातळीवर आणि जिल्हा पातळीवरही मागे पडल्याचे समजत आहेत. अशातच अजून कोणी स्पर्धक तयार व्हायच्या आतच माजी आमदार राहुल जगताप यांच्या कार्यकर्त्यांचे शिष्टमंडळ उपमुख्यमंत्री अजित पवार यांची गाठ घेणार आहेत.

Advertisement

यावेळी हे शिष्टमंडळ जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी जगताप यांची निवड करावी, अशी मागणी करणार आहे. त्यामुळे आता जगताप यांची ही मोर्चेबांधणी कितपत यशस्वी होणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलेले आहे.       

Advertisement

महाविकास आघाडीतही सर्वाधिक जागा जिंकत राष्ट्रवादी काँग्रेसने बँकेवर वर्चस्व प्रस्थापित केले आहे.  विधानसभा निवडणुकीतील पाडापाडीचा बदला घेण्यात असंतुष्ट नेते यशस्वी झाल्याचेही मानले जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस ९, भाजप ७, काँग्रेस ४ आणि शिवसेना १ असे उमेदवार निवडून आले आहेत

Advertisement

संपादन : स्वप्नील पवार

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply