Take a fresh look at your lifestyle.

‘त्याच’ ठिकाणी होणार जिल्हा बँकेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाची निवड; ‘या’ 4 लोकांच्या उपस्थितीत ठरणार सर्वकाही

अहमदनगर :

Advertisement

जिल्हा बँक निवडणूक हा जिल्हा आणि राज्य पातळीवर चर्चेचा विषय ठरला. या निवडणुकीत राज्याच्या नेत्यांनीही लक्ष घातले होते. अनेक नाट्यमय घडामोडीनंतर जिल्हा बँक निवडणुकीचे निकाल समोर आले. अखेर निकाल आले आणि आता भाजपकडे 7 तर महाविकास आघाडीकडे 14 संचालक आहेत.

Advertisement

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष पदासाठी येत्या शनिवारी सभा बोलविण्यात आलेली आहे. अध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठी इच्छुकांकडून गाठीभेटी घेतल्या जात आहेत. पडद्याआडून घडामोडी सुरु आहेत. बँकेतील नवनिर्वाचित संचालकांवर नजर टाकल्यास राष्ट्रवादीचे पारडे जड आहे. त्यामुळे बँकेचा अध्यक्ष राष्ट्रवादीचाच होईल, असे दिसते.

Advertisement

आता मिळालेल्या माहितीनुसार, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष पदासाठी कुणाची निवड होणार, हे मुंबईत ठरणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या निवडणुकीत लक्ष घालून राजकारण आपल्या बाजूने फिरवले.

Advertisement

उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख आणि नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या उपस्थितीत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाची निवड होणार आहे.

Advertisement

संपादन : स्वप्नील पवार

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply