Take a fresh look at your lifestyle.

‘त्या’ कारणामुळे दिला मंत्रीपदाचा राजीनामा; राजीनाम्यानंतर राठोड यांची पहिली आणि स्पष्ट प्रतिक्रिया

मुंबई :

Advertisement

पूजा चव्हाण (Pooja Chavan) मृत्यू प्रकरणामुळे चर्चेत आलेल्या आणि अनेक गंभीर आरोप झालेल्या वनमंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांनी अखेर राजीनामा दिला आहे. राठोड यांच्या राजीनाम्यासाठी भारतीय जनता पक्षानं गेल्या काही दिवसांपासून आक्रमक भूमिका घेतली होती.

Advertisement

या राजीनाम्यानंतर आता आमदार संजय राठोड यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. ते म्हणाले की, मी माझा राजीनामा मा. मुख्यमंत्र्यांकडे दिलेला आहे. आमच्या बंजारा समाजाची तरुणी पूजा चव्हाणचा मृत्यू झाला. मात्र अनेक दिवसांपासून विरोधी पक्षांनी प्रसारमाध्यम, समाज माध्यमातून घाणेरडं राजकारण करण्याचा प्रयत्न केला. मीडियातून माझ्या समाजाची, माझी वैयक्तिक बदनामी करण्याचा प्रयत्न केला. मला राजकीय जीवनातून उठवण्याचा प्रकार घडला. 

Advertisement

पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, गेली तीस वर्ष मी केलेलं राजकीय आणि सामाजिक काम उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न झाला. या प्रकरणात निष्पक्ष चौकशी व्हावी, हीच माझी मागणी आहे. याचा तपास व्हावा, मी बाजूला राहून चौकशी व्हावी, सत्य बाहेर यावं, ही माझी भूमिका आहे. मुख्यमंत्र्यांना हे सांगून मी राजीनामा दिला.

Advertisement

पुढे त्यांनी स्पष्ट केले की, माझ्यासोबत अनिल परब, अनिल देसाई होते, मी सध्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. आमदारकीचा राजीनामा दिला नाही. चौकशीनंतर परिणाम भोगायला पाहिजे होते, परंतु विरोधकांनी उद्या अधिवेशन चालू देणार नाही, हे बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाच्या विरोधात आहे, लोकशाहीच्या विरोधात आहे, परंतु विरोधी पक्षांनी संसदीय कार्य चालू देणार नाही, असं म्हटलं, म्हणून पदापासून दूर होण्याचा निर्णय घेतला.   

Advertisement

संपादन : स्वप्नील पवार

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply