Take a fresh look at your lifestyle.

आता भाजपने केली ‘त्यांच्या’ राजीनाम्याची मागणी; वाचा, नेमकं काय म्हणाले चंद्रकांत पाटील

मुंबई :

Advertisement

पूजा चव्हाण (Pooja Chavan) मृत्यू प्रकरणामुळे चर्चेत आलेल्या आणि अनेक गंभीर आरोप झालेल्या वनमंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांनी अखेर राजीनामा दिला आहे. राठोड यांच्या राजीनाम्यासाठी भारतीय जनता पक्षानं गेल्या काही दिवसांपासून आक्रमक भूमिका घेतली होती. आता राठोड यांच्या राजीनाम्यानंतर भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष व आमदार चंद्रकांत पाटील यांनी अजून एका मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

Advertisement

ते म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जे केले, तेच आता शरद पवार (Sharad Pawar) यांनी करावे. धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यायला हवा.

Advertisement

लोकमत या वृत्तपत्राने दिलेल्या माहितीप्रमाणे, चंद्रकांत पाटील  पुढे बोलताना म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे प्रबोधनकार ठाकरे आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे वारसदार आहेत. त्यांनी यापूर्वीच ठाकरे बाणा दाखवायला हवा होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उशिरा का होईना, वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा घेतला त्याचे आम्ही स्वागत करतो. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांच्याप्रमाणे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यायला हवा.

Advertisement

दरम्यान ‘वनमंत्री संजय राठोड यांनी राजीनामा दिला आहे. आम्ही त्याचं स्वागत करतो. पण केवळ राजीनामा दिला म्हणून चालणार नाही, याप्रकरणी पोलिसांनी फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावे’, अशी मागणी भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी केली आहे.

Advertisement

संपादन : स्वप्नील पवार

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply