Take a fresh look at your lifestyle.

अवघ्या दीड महिन्यात राम मंदीरासाठी झाला ‘एवढा’ निधी गोळा; आकडा पाहून व्हाल आश्चर्यचकित

मुंबई :

Advertisement

सध्या राममंदीरासाठी निधी गोळा करण्याची मोहीम जोरात सुरू आहे. या मोहिमेसाठी अनेक लोक स्वत:हून मदतीसाठी पुढे आलेले आहेत. आज या मोहिमेला सुरू होऊन तब्बल दीड महिना झाला आहे. श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने दीड महिनाभरात देशात किती निधी गोळा झाला आहे, याविषयी माहिती दिली आहे.

Advertisement

अगदी सामान्य माणसांपासून, व्यापारी, उद्योजकांपर्यंत सर्वजण या मोहिमेत सहभागी होत राम मंदिरासाठी देणग्या दिल्या आहेत. रामनाथ कोविंद यांनी पाच लाख तर उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या पत्नी उषा नायडू यांनी पाच लाख 11 हजार रुपयांची देणगी दिली. सर्वपक्षीय आमदार, खासदार, मंत्री, मुख्यमंत्री आणि राज्यपालांनीही देणग्या दिल्याची माहिती मिळाली आहे. 

Advertisement

जानेवारीमध्ये सुरू झालेल्या या अभियानात आतापर्यंत जवळपास 2100 कोटी रुपये दान जमा झालं आहे. हा जमा झालेला निधी तीन राष्ट्रीयीकृत बॅंकांमध्ये ठेवला जात आहे. श्रीराम मंदिर उभारणीसाठी देणगीचा ओघ सुरू असल्याची चित्र देशभरात असल्याचे समजत आहे. श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंद देव गिरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारपर्यंत 2100 कोटी रुपये जमा झाले आहेत.

Advertisement

कुठवर आलं आहे मंदिराचं काम :-

Advertisement

राम मंदिराच्या उभारणीसाठी परिसरात सुरू असलेलं खोदकाम जवळपास 16 फूटांपर्यंत झालं आहे. ज्या लेवलवर 5 ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पूजा केली होती, त्या लेवलपासून 5 मीटर खाली जमिनीचं खोदकाम झालं आहे.

Advertisement

संपादन : स्वप्नील पवार

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement
Advertisement

Leave a Reply