Take a fresh look at your lifestyle.

आणि राठोडांचा ‘समाजा’नेच घेतला कैवार; पण ठाकरेंनी दिलाच नाही आधार..!

पुणे :

Advertisement

पूजा चव्हाण या तरुणीच्या आत्महत्या प्रकरणात अखेरीस शिवसेना नेते संजय राठोड यांना राजीनामा द्यावा लागला आहे. मात्र, या संपूर्ण प्रकरणात पक्ष, सरकार आणि अख्खा समाज बरोबर असतानाही भाजपच्या आक्रमक भूमिकेपुढे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काही राठोडांना आधार देऊ शकले नाहीत.

Advertisement

ठाकरे यांच्याकडे आपला मंत्रिपदाचा राजीनामा सुपूर्द केल्यानंतर राठोड यांनी म्हटले आहे की, अनेक दिवसांपासून आमच्या बंजारा समाजाची तरूणी पूजा चव्हाण हिच्या दुदैवी मुत्यूवरून विरोधी पक्षाने घाणेरडे राजकारण केले. समाजाची बदनामी केली गेली. म्हणूनच यातील खरे सत्य बाहेर येऊन निष्पक्ष चौकशी होण्याच्या हेतूने मंत्रिपदापासून बाजूला झालेलो आहे.

Advertisement

राठोड यांच्यासाठी बंजारा समाजातील अनेक संघटनांनी राज्यभरात आंदोलन करून राजीनामा न घेण्यासाठी महाविकास आघाडी सरकारवर दबाव आणला. त्याचवेळी भाजपनेही यानिमित्ताने मंत्रिमंडळाची पहिली विकेट घेण्याच्या उद्देशाने रान पेटवले. परिणामी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला राठोड यांना राजीनामा द्यावा लागला आहे.

Advertisement

पूजा चव्हाण प्रकरणात संजय राठोड यांचे नाव जोडले गेल्यानंतर आज दुसऱ्यादा ते प्रसारमाध्यमांमोर आले. मुंबईतील वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी त्यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर ते आपले म्हणणे मांडत होते. त्यात त्यांनी समाजाच्या भावनेला हात घातला. मात्र, ठाकरे सरकारने आधार न दिल्याने त्यांना मंत्रिपद गमवावे लागल्याने त्यांच्या समर्थकांनी नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे.

Advertisement

संपादन : संतोष वाघ   

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply