Take a fresh look at your lifestyle.

राजीनामा दिल्यानंतरही राठोड यांच्या अडचणी अजूनच वाढल्या; ‘ती’ व्यक्ती झाली पोलिस ठाण्यात हजर

मुंबई :

Advertisement

पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात वाढत्या दबावानंतर अखेर वनमंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांनी राजीनामा दिला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांची वर्षा निवासस्थानी भेट घेत संजय राठोड यांनी कॅबिनेट मंत्रिपदाचा राजीनामा सुपूर्द केला.

Advertisement

या राजीनाम्यानंतर हे प्रकरण निवळले आहे, असे दिसत असताना एक मोठा अनपेक्षित प्रकार समोर आला आहे. पूजा प्रकरणात वानवडी पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद झाली असून इतके आरोप केलं जात असून कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. या घटनेला २१ दिवस झाल्यानंतरही गुन्हा दाखल झालेला नाही.

Advertisement

आता या प्रकरणात पहिला गुन्हा दाखल होणार आहे. पूजा राठोडची चुलत आजी शांताताई राठोड आज गुन्हा दाखल करण्यासाठी वानवडी पोलीस ठाण्यात दाखल झाल्या आहेत. आता त्यांचा जबाब नोंदवण्याचे काम पोलीस करत असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी दिली.

Advertisement

दरम्यान आता भाजप पुन्हा एकदा आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे. राठोड यांच्या राजीनाम्यानंतर ‘राठोड यांनी राजीनामा दिला आहे. आम्ही त्याचं स्वागत करतो. पण केवळ राजीनामा दिला म्हणून चालणार नाही, याप्रकरणी पोलिसांनी फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावे’, अशी मागणी भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी केली आहे.   

Advertisement

संपादन : स्वप्नील पवार

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply