Take a fresh look at your lifestyle.

राजीनाम्यानंतरही भाजप आक्रमकच; आता केली ‘ही’ मोठी मागणी

मुंबई :

Advertisement

पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात वाढत्या दबावानंतर अखेर वनमंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांनी राजीनामा दिला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांची वर्षा निवासस्थानी भेट घेत संजय राठोड यांनी कॅबिनेट मंत्रिपदाचा राजीनामा सुपूर्द केला.

Advertisement

या प्रकरणानंतर भाजप नेते आणि विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते प्रविण दरेकर यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, राजीनामा घेतला याबद्दल त्यांचे स्वागत, पूजा चव्हाणच्या आत्महत्येचे कारण समोर आलं पाहिजे, ठाकरी बाणा उशिरा का दाखवून त्यांनी राजीनामा घेतला. हे पहिल्याच दिवशी झालं असतं, तर आणखी चांगलं झालं असतं.

Advertisement

आता भाजप पुन्हा एकदा आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे. राठोड यांच्या राजीनाम्यानंतर ‘राठोड यांनी राजीनामा दिला आहे. आम्ही त्याचं स्वागत करतो. पण केवळ राजीनामा दिला म्हणून चालणार नाही, याप्रकरणी पोलिसांनी फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावे’, अशी मागणी भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी केली आहे.   

Advertisement

पुढे ते म्हणाले की, फौजदारी गुन्हे दाखल करावे लागतील. तरच पूजा चव्हाणची हत्या झाली की आत्महत्या झाली हे समजेल. या प्रकरणाची सखोल चौकशी करावी लागेल, तसेच मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी राठोड यांच्यावर कारवाई करण्यात चालढकल का केली? असा सवाल शेलार यांनी केला आहे.

Advertisement

संपादन : स्वप्नील पवार

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply