Take a fresh look at your lifestyle.

अखेर मुख्यमंत्र्यांनी घेतला ‘राजीनाम्याबाबत’ निर्णय; वाचा, काय झाला निर्णय

मुंबई :

Advertisement

वनमंत्री संजय राठोड आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची बैठक संपली आहे. त्यानंतर नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत उद्धव ठाकरे यांनी चर्चा केली. या चर्चेनंतर संजय राठोड यांचा राजीनामा घेण्यात आला आहे.

Advertisement

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी अखेर शिवसेनेचे नेते आणि वनमंत्री संजय राठोड यांना आपल्या पदावरून पायउतार व्हावे लागले आहे. राठोड यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपुर्द केला आहे. मुख्यमंत्र्यांनी राठोड यांचा राजीनामा मंजूर केला आहे. संजय राठोड यांच्या राजीनाम्यामुळे शिवसेनेला मोठा झटका मानला जात आहे.

Advertisement

संजय राठोड यांनी आपल्या वनमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात व्हायरल झालेले फोटो, ऑडिओ क्लिप्स आणि काही व्हिडिओ सर्वांसमोर आल्यांतर त्यांच्या अडचणी वाढल्या होत्या. या कारणामुळे मागील कित्येक दिवसांपासून त्यांचा राजीनामा घेण्याची मागणी भाजपने लावून धरली होती.

Advertisement

वनमंत्री संजय राठोड राजीनामा दिला आहे. पण, पोहरादेवी मंदिराच्या महंत जितेंद्र महाराज यांनी विरोध केला आहे. तसंच, संजय राठोड यांचा राजीनामा घेतला तर आमदारकीचा राजीनामा देण्यास भाग पाडू असा इशाराही दिला आहे.

Advertisement

संपादन : स्वप्नील पवार

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply