Take a fresh look at your lifestyle.

संजय राठोड राजीनामा घेऊन ‘वर्षा’वर; वाचा, कशी खेळली जातेय ‘या’ प्रकरणात ‘तांत्रिक’ खेळी

मुंबई :

Advertisement

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज संध्याकाळी 5.30 वाजता सह्याद्री अतिथीगृहावर कॅबिनेटची बैठक होणार आहे. या बैठकीपूर्वीच राठोड हे त्यांची पत्नी शीतल आणि मेव्हणे सचिन नाईक यांच्यासह मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे.

Advertisement

पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी शिवसेना नेते आणि वनमंत्री संजय राठोड यांच्या राजीनाम्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर दबाव वाढला आहे. या भेटीत राठोड हे राजीनामा घेऊन गेले आहेत. मात्र ‘प्रकरणाची चौकशी पूर्ण झाल्यावरच राजीनामा मंजूर करावा’, अशी भावनिक विनंती त्यांनी केली आहे.  

Advertisement

या प्रकरणात तांत्रिक खेळी खेळली जात असल्याचे म्हटले आहे. एका बाजूला राजीनामा दिला मात्र मंजूर न करण्याची विनंती केली जात आहे. दुसर्‍या बाजूला पत्नी आणि मेव्हण्याला घेऊन जात राठोड यांनी भावनिक साद घातली जात आहे.

Advertisement

दरम्यान, पोहरादेवीच्या महंतांनी पुन्हा एकदा राठोड यांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचं म्हटलं आहे. कोणत्याही चौकशीशिवाय राठोड यांचा राजीनामा घेऊ नये, असं आवाहन महंतांनी मुख्यमंत्र्यांना केलं आहे. राठोड यांचा राजीनामा घेऊ नये म्हणून पोहरादेवीतून मुख्यमंत्र्यांना ई-मेल पाठवण्यात येणार असल्याचं महंत जितेंद्र महाराज यांनी स्पष्ट केलं.

Advertisement

संपादन : स्वप्नील पवार

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply