Take a fresh look at your lifestyle.

म्हणून ‘पत्नीला’ घेऊन संजय राठोड मुख्यमंत्र्यांच्या भेटीला; वाचा, काय आहे कारण

मुंबई :

Advertisement

पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी शिवसेना नेते आणि वनमंत्री संजय राठोड यांच्या राजीनाम्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर दबाव वाढला आहे. त्याता आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलेल्या सूचक ट्वीटमुळे चर्चांना उधाण आलं आहे.

Advertisement

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज संध्याकाळी 5.30 वाजता सह्याद्री अतिथीगृहावर कॅबिनेटची बैठक होणार आहे. या बैठकीपूर्वीच राठोड हे त्यांची पत्नी शीतल आणि मेव्हणे सचिन नाईक यांच्यासह मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत.

Advertisement

राठोड हे सपत्नीक मुख्यमंत्र्यांना भेटणार आहेत. विशेष म्हणजे त्यांच्यासोबत त्यांचे मेव्हणेही असणार आहेत. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. पूजा चव्हाण प्रकरणात आपण निर्दोष असल्याचं राठोड हे पत्नीच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना सांगण्याचा प्रयत्न तर करत नाहीत ना? अशी शक्यताही वर्तवली जात आहे.

Advertisement

अशातच आता वनमंत्री संजय राठोड हे सपत्नीक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीला रवाना झाल्याचे समजत आहे. वनमंत्रिपदाचा राजीनामा देण्याची शक्यता वाढली असल्याचे अधिकृत सूत्रांकडून समजत आहे. अशातच आता वनमंत्री पदासाठी कुणाची वर्णी लागणार?, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलेले आहे.

Advertisement

संपादन : स्वप्नील पवार

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply