Take a fresh look at your lifestyle.

आपला वनमंत्री करण्यासाठी मुंबई विरुद्ध विदर्भ; ‘या’ नावांची जोरदार चर्चा

मुंबई :

Advertisement

पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी शिवसेना नेते आणि वनमंत्री संजय राठोड यांच्या राजीनाम्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर दबाव वाढला आहे. त्याता आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलेल्या सूचक ट्वीटमुळे चर्चांना उधाण आलं आहे.

Advertisement

अशातच आता वनमंत्री संजय राठोड हे सपत्नीक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीला रवाना झाल्याचे समजत आहे. वनमंत्रिपदाचा राजीनामा देण्याची शक्यता वाढली असल्याचे अधिकृत सूत्रांकडून समजत आहे. अशातच आता वनमंत्री पदासाठी कुणाची वर्णी लागणार?, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलेले आहे.

Advertisement

आपल्या विभागाचा वनमंत्री व्हावा, यासाठी मुंबई विरुद्ध विदर्भ या 2 विभाग एकमेकांचा अंदाज घेत आहेत. संजय राठोड यांनी राजीनामा दिल्यावर गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांना कॅबिनेट मंत्रीपद देऊन विदर्भातील एखाद्या आमदाराला राज्यमंत्री पद दिली जाण्याचीही शक्यता सांगितली जात आहे.

Advertisement

विदर्भात मंत्रीपद देण्याचे ठरल्यास गोपिकिशन बाजोरिया, नितीन देशमुख आणि संजय रायमुळकर यांची नावे चर्चेत आहेत. काही दिवसांपूर्वी संजय राठोड यांनी केलेलं शक्तिप्रदर्शन आणि एकंदर परिस्थितीवरून उद्धव ठाकरे त्यांच्यावर नाराज असल्याचं पाहायला मिळत होतं.

Advertisement

अशातच आता आधी मुख्यमंत्र्यांनी भेट नाकारल्याचे समजत होते. मात्र आता मिळालेल्या माहितीनुसार  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राठोडांना फक्त 2 मिनिटे भेटण्याची वेळ दिली असल्याचे समजत आहे.

Advertisement

संपादन : स्वप्नील पवार

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply