Take a fresh look at your lifestyle.

मोठी बातमी… मुख्यमंत्रीही झाले राठोड यांच्याविरोधात आक्रमक; उचलले ‘ते’ पाऊल

मुंबई :

Advertisement

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी शिवसेना नेते आणि वनमंत्री संजय राठोड यांच्यावर अनेक टिका आणि वक्तव्य होत आहेत. त्यांच्या राजीनाम्याच्या अनेक चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. संजय राठोडांच्या राजीनाम्यावर राऊतांनी सूचक ट्विटही केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या हातातील राजदंड काय सांगतो की महाराष्ट्र धर्म म्हणजेच राजधर्माचे पालन, असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले होते.

Advertisement

आता याच पार्श्वभूमीवर एक मोठी बातमी समोर आली आहे. शिवसेना नेते आणि वनमंत्री संजय राठोड यांच्यावर अखेर शिवसेनेनं कारवाई करण्याचा निर्णय घेतल्याचं दिसत आहेत. कारण संजय राठोड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेटीसाठी वेळ मागितली होती पण त्यांनी ती नाकारल्याची माहिती आहे.

Advertisement

दरम्यान संजय राठोड आपल्या पत्नीसह निवासस्थानाहून रवाना झाले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मनधरणी करण्यासाठी राठोड वर्षा बंगल्यावर त्यांची भेट घेणार आहेत. मात्र आता वेळ नाकारली असल्याची माहिती समोर आल्याने राठोड परत फिरणार का?, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

Advertisement

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला १ मार्चपासून सुरुवात होणार आहे. या पार्श्वभूमीवर भाजपने पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात नाव आलेले संजय राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी केली.

Advertisement

सत्ताधाऱ्यांच्या मंत्र्यांना लैंगिक व्यवहाराचा स्वैराचार दिला आहे का? जर सरकार संजय राठोड यांचा राजीनामा घेत नसेल तर भाजपचे आमदार राजीनामा देतील, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. सामान्यांकरीत वेगळा न्याय आणि सर्वसामान्यांसाठी वेगळा न्याय आहे का? असा संतप्त सवाल फडणवीस यांनी केला.

Advertisement

संपादन : स्वप्नील पवार

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply