Take a fresh look at your lifestyle.

तब्बल ‘इतक्या’ शेतकर्‍यांना मिळणार पीक विम्याचे ३ कोटी; नगर जिल्ह्यातील शेतकर्‍यांना दिलासा

अहमदनगर :

Advertisement

जिल्ह्यातील शेतकर्‍यांना आता दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. गेल्या खरीप व रब्बी हंगामात आंबे बहार फळबाग पिकांचे नुकसान झाले होते. त्या पिकांचा विमा मंजूरही झाला. मात्र प्रस्तावात असणार्‍या काही ठराविक त्रुटींमुळे विमा मिळू शकला नाही.

Advertisement

मात्र आता विमा मंजूर होऊनही प्रस्तावातील त्रुटींमुळे विम्याच्या लाभापासून वंचित राहिलेल्या शेतकर्‍यांना आनंदाची बातमी आहे. नगर जिल्ह्यातील तब्बल ५ हजार १२५ शेतकऱ्यांना आपल्या विम्याची थकीत रक्कम मिळणार आहे. आता ५ हजार १२५ शेतकऱ्यांच्या खात्यावर तब्बल ३ कोटी ४१ लाख ७७ हजार ५२ रुपये इतकी विमा रक्कम जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला.

Advertisement

याप्रकरणी जिल्हा सहकारी बँकेचे संचालक प्रशांत सबाजीराव गायकवाड यांनी लक्ष घातले होते. गायकवाड यांच्या पाठपुराव्याला यश आले असून वंचित विमा धारकांना विम्याची रक्कम देण्याचे विमा कंपनीने मान्य केले. 

Advertisement

आता  जिल्हा सहकारी बँकेचे संचालक उदय शेळके व प्रशांत गायकवाड यांनी असे आवाहन केले आहे की, जिल्ह्यातील सन २०१९-२० या वर्षातील खरीप व रब्बी हंगामातील आंबे बहार फळबाग पीक विम्यासाठी पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांच्या याद्या जिल्हा सहकारी बँकेच्या प्रत्येक तालुक्यातील तालुका विकास अधिकारी कार्यालयात उपलब्ध आहेत. या याद्यांमध्ये नाव आहे पण विम्याचा लाभ मिळालेला नाही अश्या शेतकऱ्यांनी संबंधित तालुक्याच्या तालुका विकास अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा.  

Advertisement

संपादन : स्वप्नील पवार

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply