Take a fresh look at your lifestyle.

मोदींनी स्वत:च सांगितली त्यांच्यात असलेली ‘ती’ कमी; ज्याचा होतोय अजूनही पश्चाताप

दिल्ली :

Advertisement

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आज आपल्या ‘मन की बात’ (Mann Ki Baat) या मासिक कार्यक्रमाच्या 72 व्या भाषणात देशाला संबोधित केले. यावेळी त्यांनी आपली सर्वात मोठी कमतरताही सांगितली. पंतप्रधान म्हणाले की, जगातील सर्वात जुनी भाषा तमिळ शिकली नाही, याचा मला खेद आहे.

Advertisement

पंतप्रधान म्हणाले की, ही एक सुंदर भाषा असून ती जगभरात लोकप्रिय आहे. पुढे ते म्हणाले, तामिळ साहित्याची गुणवत्ता आणि त्यामध्ये लिहिलेल्या कवितांच्या खोलीबद्दल बरेच लोक मला बरेच काही सांगून गेले आहेत, परंतु मला ही भाषा शिकता आली नाही, याचा अजूनही पश्चाताप आहे.

Advertisement

हैदराबादच्या अपर्णाच्या प्रश्नाचा संदर्भ देताना पीएम मोदी म्हणाले की, कधीकधी अगदी लहान आणि साध्या प्रश्नामुळेही मन थरथरते. हे प्रश्न फार मोठे नाहीत, अतिशय सामान्य आहेत, तरीही ते आम्हाला विचार करायला भाग पाडतात. ते म्हणाले, काही दिवसांपूर्वी हैदराबादच्या अपर्णाजींनी मला असा प्रश्न विचारला की, तुम्ही इतकी वर्षे पंतप्रधान आहात, मुख्यमंत्री आहात, तुम्हाला वाटते की काहीतरी कमी राहिली आहे?

Advertisement

हा प्रश्न जितका कठीण होता, तितका सोपा होता. मी याचा विचार केला आणि मी मला स्वतःलाच सांगितले की, माझ्यातील एक उणीव अशी आहे की, जगातील सर्वात जुनी भाषा तमिळ शिकण्यासाठी मी जास्त प्रयत्न करू शकलो नाही , मला तमिळ शिकता आली नाही.

Advertisement

संपादन : स्वप्नील पवार

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply