Take a fresh look at your lifestyle.

वीजदर सवलत : यंत्रमाग घटकांनी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी ‘या’ तारखेपर्यंत अंतिम मुदत

मुंबई :

Advertisement

महाराष्ट्र वस्त्रोद्योग धोरण २०१८-२३ अंतर्गत वीजदर सवलत मिळणाऱ्या यंत्रमाग घटकांसाठी आयुक्तालयाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करण्यासाठी दि. 28 फेब्रुवारी, 2021 ही अंतिम मुदत आहे. त्यामुळे वीजदर सवलत मिळण्यासाठी यंत्रमागधारकांनी लवकरात लवकर ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन वस्त्रोद्योग आयुक्तालयाने केले आहे.

Advertisement

वस्त्रोद्योग आयुक्तालयाने दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे की, राज्य शासनाच्या दिनांक 21 डिसेंबर 2018 अन्वये राज्याच्या वस्त्रोद्योग धोरण 2018-23 अंतर्गत वस्त्रोद्योग घटकांना वीजदर सवलत लागू करण्यात आली आहे. वीजदर सवलतीस पात्र असणाऱ्या यंत्रमाग घटकांना आयुक्तालयाच्या https://www.dirtexmah.gov.in वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज दिनांक 31 डिसेंबर 2020 पर्यंत अर्ज सादर करणे आवश्यक होते.

Advertisement

परंतु यंत्रमाग घटकांनी ऑनलॉईन नोंदणी केलेली नसल्याचे निदर्शनास येत असल्यामुळे 27 अश्वशक्ती पेक्षा कमी व त्यापेक्षा जास्त जोडभार असलेल्या यंत्रमाग घटकांना ऑनलाईन अर्ज नोंदणी करण्याची अंतिम मुदतवाढ दिनांक 28 फेब्रुवारी 2021 पर्यंत वाढविण्यात येत आहे.

Advertisement

या मुदतवाढीमध्ये जर संबंधित यंत्रमागांनी ऑनलाईन नोंदणीकरिता अर्ज सादर केला नाही, तर सदर यंत्रमाग नोंदणी करीत नाही तोपर्यंत त्यांची वीजदर सवलत बंद करण्यात येईल, असे वस्त्रोद्योग आयुक्त शीतल तेली-उगले यांनी कळविले आहे.

Advertisement

संपादन : स्वप्नील पवार

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply