Take a fresh look at your lifestyle.

मोदींचा दुटप्पीपणा ‘मन की बात’ मधून उघड; ‘त्या’ मोठ्या मोहिमेला मोदी सरकारनेच दिला झटका

दिल्ली :

Advertisement

आज ‘मन की बात’ या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विविध विषयांवर भाष्य केले. यावेळी त्यांनी ‘आत्मनिर्भर भारत’ या मोहिमेचे कौतुक केले. ते म्हणाले की, आत्मनिर्भर भारताचा मंत्र आता गावोगावी पोहोचत आहे.

Advertisement

मात्र मोदी सरकारने घेतलेल्या निर्णयाकडे मोदींचे लक्ष नसावे, अन्यथा त्यांनी हे बोलून दाखवले नसते. कारण भारत-चीन तनाव सध्या निवळला असल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या वर्षभरापासून दोन्ही देशातील संबंध ताणलेले होते. भारताने तब्बल 2 वेळा सर्जिकल स्ट्राईक करत चीनला नमवले होते. तसेच चीनी कंपन्यांसोबत असणारे अनेक व्यापारी करारही रद्द केले होते.  

Advertisement

व्यापारात मोठे नुकसान झाल्याने चीनने अखेर माघार घेतली असल्याचे समजत आहे. भारतानेही मोठे मन करत ‘हिंदी-चीनी भाई-भाई’चा संदेश दिला आहे. याच पार्श्वभूमीवर स्वदेशी मोहिमेला झटका बसला आहे.

Advertisement

आशियातील सर्वात मोठ्या बाजारपेठेत माल विक्री आणि गुंतवणूक करण्यासाठी चीनी कंपन्यांनी भारत सरकारला प्रस्ताव पाठवले आहेत. चिनी कंपन्यांचे थेट परकीय गुंतवणुकीचे प्रस्ताव मंजूर करण्यास सुरुवात केली आहे.     

Advertisement

एकूणच पुन्हा एकदा चीनी आणि इतर परकीय लोकांना संधी देणे म्हणजे स्वदेशी आणि आत्मनिर्भर मोहिमेला धक्का बसणार हे मात्र निश्चित आहे. एवढे व्यापारी प्रस्ताव मंजूर करूनही मोदीजींनी आत्मनिर्भर भारताचा मंत्र आता गावोगावी पोहोचत असल्याचे सांगितले. यावरून मोदींचा दुटप्पीपणा समोर आला आहे.

Advertisement

संपादन : स्वप्नील पवार

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply