Take a fresh look at your lifestyle.

‘सत्यवादी’ मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाकडे राज्याचे लक्ष; राउत यांच्या ट्विटवरही झाली चर्चा सुरू

पुणे :

Advertisement

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणामुळे महाविकास आघाडी सरकार अडचणीत सापडले आहे. अशावेळी पोलिसांवर दबावाचे आरोप केले जात असल्याने राज्यातील कायदा-सुव्यवस्था याबाबतीत भाजपने प्रश्न विचारण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, शिवसेना नेते संजय राउत यांनी एक ट्विटर पोस्ट केल्याने राजीमाण्यावर शिक्कामोर्तब होणार असेच म्हटले जात आहे.

Advertisement

औरंगाबाद दौऱ्यावर असताना संजय राऊतांनी म्हटले होते की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे न्यायप्रिय नेते आहेत. ते मिस्टर सत्यवादी आहेत. त्यामुळे पूजा चव्हाण प्रकरणात ते संपूर्ण सत्य जाणून घेऊन योग्य तो निर्णय घेतील. ते कुणावरही अन्याय करणार नाहीत आणि कुणाला पाठीशीही घालणार नाहीत. उद्धव ठाकरे आणि संजय राठोड यांच्यात बोलणं झालेलं असलं तरी त्याविषयी मी बोलणं संकेताला धरून नाही.

Advertisement

Sanjay Raut on Twitter: “https://t.co/GWenwe6eQR” / Twitter

Advertisement

त्याच धाग्यावर आता त्यांनी एक ट्विटर पोस्ट शेअर केली आहे. त्यात ‘सिंहासनाधिष्ठीत छत्रपती शिवरायांच्या हातातील हा राजदंड काय सांगतो?, महाराष्ट्र धर्म म्हणजेच राजधर्माचे पालन!’ असा मजकूर आहे. मागील दोन दिवसांपासून संजय राठोड यांना राजीनामा देण्यास सांगण्यात आल्याच्या चर्चा सुरू असून, शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी सूचक ट्विट करत संजय राठोड राजीनामा देणार असल्याच्या मुद्द्याककडे अप्रत्यक्षपणे म्हटले असल्याचे वृत्त लोकसत्ता वृत्तपत्राने दिले आहे.

Advertisement

संजय राऊत यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं छायाचित्र असलेला फोटो ट्विट करून ठाकरे सरकार सत्यवादी असल्याचे पुन्हा एकदा सूचित केले आहे. पूजा चव्हाण या तरुणीनं पुण्यात आत्महत्या केली होती. तिच्या आत्महत्येनंतर व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपमुळे हे प्रकरण चर्चेत आहे. भाजपाच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी थेट राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी यानिमित्ताने केली आहे.

Advertisement

संपादन : संतोष वाघ   

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply