Take a fresh look at your lifestyle.

पूजाप्रकरणी चित्रा वाघ यांनी उपस्थित केले ‘ते’ ३ प्रश्न; पहा काय आहेत ते

नाशिक :

Advertisement

पूजा चव्हाण प्रकरणामुळे महाविकास आघाडीला राजकीयदृष्ट्या घेरण्याची संधी भाजपला मिळाली आहे. यामध्ये भाजपने आक्रमक भूमिका घेऊन शिवसेनेचे वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा मागितला आहे.

Advertisement

दरम्यान, शनिवारी नाशिक येथे भाजपच्या महिला आघडीच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी सरकारला तीन महत्वाचे प्रश्न केले आहेत. त्यांच्या प्रश्नाचा रोख थेट पुणे पोलीस आणि राज्य सरकारच्या जबाबदार मंत्र्यांवर आहे. त्यामुळे आता याप्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सरकार काय प्रत्युत्तर देते त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Advertisement

पूजा चव्हाण प्रकरणात पुणे पोलिसांत गुन्हा का नाही? पूजाच्या फोनवरील ४५ मिस्ड कॉल कोणत्या संजय राठोड यांचे? या दोन प्रश्नांनंतर “पुणे कंट्रोल रूमवरून दिला गेलेला ९१४६८७०१०० हा फोन नंबर कुणाचा? असे तीन प्रश्न वाघ यांनी नाशिक येथे उपस्थित केले आहेत.

Advertisement

पूजा चव्हाणच्या मृत्युप्रकरणी वनमंत्री संजय राठोड यांच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी वाघ यांनी केली आहे. दरम्यान, राठोड यांच्या राजीनाम्यासाठी सरकारवर दबाव वाढत आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हेही राठोड यांच्या कार्यकर्त्यांनी राज्यभरात घेतलेल्या राजकीय कार्यक्रमांमुळे नाराज असल्याच्या बातम्या येत आहेत.

Advertisement

संपादन : संतोष वाघ   

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply