Take a fresh look at your lifestyle.

राजीनाम्यावर होणार ‘तेंव्हाच’ निर्णय; राज्याचे लागले ठाकरेंच्या निर्णयाकडे लक्ष..!

मुंबई :

Advertisement

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सरकार दुसऱ्यांदा राजकीय अडचणीचा सामना करीत आहे. त्यातही आताच्या घटनेमुळे तर शिवसेना पुरती ढवळून निघाली आहे. वनमंत्री संजय राठोड यांच्या राजीनाम्यासाठी राज्य सरकारवर दबाव वाढत आहे. अशावेळी पुढील 24 तासांमध्येच काय तो याबाबतचा निर्णय होणार आहे.

Advertisement

मुख्यमंत्री ठाकरे यांनी मंत्री राठोड यांना राजीनामा देण्याच्या आदेशाच्या बातम्या फिरण्यास सुरुवात झालेली आहे. मात्र, सामाजिक न्यायमंत्री व राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्या प्रकरणाचा दाखला देऊन राठोड यांच्या राजीनाम्याचा निर्णय घ्यावा किंवा नाही, याचा संभ्रम शिवसेनेत आहे. त्यामुळे यावर काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांचेही मत घेऊन शिवसेना राठोड यांचा राजीनामा घेणार किंवा नाही हे ठरवणार असल्याची मंत्रालयात चर्चा आहे.

Advertisement

जा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरून राज्यातील राजकीय वातावरण जोरात तापले आहे. पूजा हिला न्याय देण्यासाठी भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे. तर, संजय राठोड यांच्या समर्थकांनी याला सामाजिक अंगाने नेऊन बचावाचे प्रयत्न केले आहेत. अगदी राज्यभरात राठोड समर्थकांनी समर्थनार्थ आंदोलन काढून राज्याचे लक्ष वेधले आहे. दरम्यान, मित्रपक्ष यावर काय म्हणतात यावरच राठोड यांच्या मंत्रिपदाचे भवितव्य ठरणार असल्याचे म्हटले जात आहे.

Advertisement

नाशिक येथे राठोड यांच्या हकालपट्टीची मागणी करीत भाजप प्रदेश महिला उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी पुणे पोलिसांच्या तपासावर जोरदार टीका केली. राठोड यांच्या राजीनाम्यासाठी भाजपने शनिवारी नाशिक, मुंबई, नवी मुंबई, औरंगाबाद, सिंधुदुर्गसह राज्यभरात ठिकठिकाणी अांदोलन केले आहे.

Advertisement

तसेच भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सरकारला इशारा दिला आहे. पाटील यांनी म्हंटले आहे की, सोमवारपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत असून तत्पूर्वी राज्य सरकारने राठोड यांचा राजीनामा घ्यावा. तसे न केल्यास या मुद्द्यावर तोंड न उघडणाऱ्या राज्य सरकारला अधिवेशनात तोंड उघडू देणार नाही. आम्ही सभागृह चालू देणार नाही.

Advertisement

एकूणच पुढील 24 तासात जो काही निर्णय होईल त्यावरच राठोड यांच्या मंत्रिपदाच्या कारकिर्दीची दिशा ठरणार आहे.

Advertisement

संपादन : सचिन पाटील  

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply