Take a fresh look at your lifestyle.

बाब्बो.. म्हणून फेब्रुवारीतच आलाय उन्हाळा; पहा काय झालाय नेमका बदल..!

पुणे :

Advertisement

हवामान बदलावर चर्चा करणारे जग सध्या आरोग्याच्या मुद्द्यावर लक्ष ठेऊन आहे. त्याचवेळी या दोन्ही मुद्द्यांचा परस्परसंबंध लक्षात घेऊनही काही ठिकाणी काम चालू आहे. दरम्यान, यंदा भारतात तब्बल दोन महिने अगोदरच उन्हाळा आलेला आहे. होय, हे वास्तव आहे. सध्या उकाडा वाढलाय ना? मग हे उन्हाळ्याचे द्योतक नाही का?

Advertisement

याबाबत स्कायमेटचे (खासगी हवामान संस्था) वैज्ञानिक महेश पलावत यांनी अभ्यास करून माहिती दिली आहे. ती आपल्या सामान्य माणसाला नाहीच समजली तरी याचे परिणाम आपल्यालाच भोगावे लागणार आहेत. त्यामुळे हे नक्कीच वाचा आणि त्यानुसार आपले सर्वांचे काय चुकतेय आणि काय करायला आवश्यक आहे हेही समजून घ्या. सध्या उत्तर भारतात अनेक ठिकाणी दोन महिने अगोदरच फुले आणि फळे यांनी बहार धरला आहे.

Advertisement

पलावत यांनी म्हटलेय की, फेब्रुवारीत ४ ते ५ पश्चिम विक्षोभ आल्यावर दिल्लीच्या उत्तर भागात आणि हिमालय पर्वताच्या भागात बर्फवृष्टी आणि दिल्लीच्या शेजारी राज्याच्या उत्तर-पश्चिम मैदानी भागांत दोनेक दिवस पाऊस पडतो. मात्र, यंदा ४ फेब्रुवारीनंतर कोणत्याही पश्चिम विक्षोभाचा परिणाम मैदानी भागांत झाला नसल्याने २३ दिवसांत मैदानी भागात नोंद घेण्याइतका पाऊस झालेला नाही. याचा हा परिणाम आहे.

Advertisement

भूमध्य सागरामधून पाकिस्तानमार्गे ढग भारतात येतात ते हिमालय शिखरांना धडकण्याआधीच काश्मीरमार्गे मध्य आशियाकडे सरकले. परिणामी कोणत्याही प्रकारची ठोस हवामान हालचाल न झाल्यामुळे मैदानी भागांतील तापमान वाढत गेले. मात्र, तरीही दोनेक दिवसात दिल्ली पट्ट्यात पुन्हा एकदा तापमानात किरकोळ घसरण होऊ शकते. मात्र त्यानंतर तापमानात वाढ होईल. यातही सुखद संकेत आहे की, वेदर पॅटर्न कायम राहिला राहिल्यास मान्सून वेळेवर येऊन पाऊसही चांगला पडेल, असे पलावत यांना वाटते.

Advertisement

संपादन : सचिन मोहन चोभे  

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply