Take a fresh look at your lifestyle.

ब्राव्हो.. भारताचेही ‘इतके’ कोटींचे कर्ज आहे अमेरिकेवर; पहा किती झालाय कर्जाचा डोंगर

दिल्ली :

Advertisement

अमेरिका म्हणजे जागतिक महासत्ता. आर्थिक, लष्करी आणि राजकीयदृष्ट्या जगभरात क्रमांक एकवर असलेल्या अमेरिकेला आपल्या भारत देशानेही कर्ज दिलेले आहे. होय, हे वास्तव आहे. भारताने तब्बल १५.८ लाख कोटी रुपयांचे कर्ज अमेरिकेला दिले आहे.

Advertisement

सिनेटर अॅलेक्स मूनी यांनी अमेरिकेच्या कर्जाचा अहवाल जगजाहीर केला आहे. त्यानुसार या महासत्तेवर तब्बल २९ लाख काेटी डॉलर्सच्या कर्जाचा डोंगर आहे. आपल्याकडे नाही का, मोठ्या उद्योजकांकडे कर्जही मोठेच असते. तसाच हा प्रकार आहे.

Advertisement

अमेरिकन काँग्रेसमध्ये सिनेटर अॅलेक्स मूनी यांनी वाढत्या कर्जावर त्यांनी चिंता व्यक्त केली आहे. मागील वर्षी अमेरिकेवर २३.४ लाख कोटी डाॅलर्सचे कर्ज होते. तेच वाढून आता थेट २९ लाख कोटी डॉलरवर पोहोचले आहे.

Advertisement

चीन आणि जपानकडून या देशाने प्रत्येकी १ लाख कोटी डॉलर्सचे कर्ज घेतले आहे. तर, जागतिक वित्तसंस्था आणि इतर देशांनीही त्यांना कर्ज दिलेले आहे. एकूणच भारत जसा कर्जामध्ये आहे. तसेच जगभरातील इतर देशही कर्जात आहे. मात्र, त्याचवेळी अनेक सामान्यांना कर्ज न देणाऱ्या बँका मोठ्या उद्योजकांनी फसवल्याने अडचणीत आलेल्या आहेत.

Advertisement

वृत्तसंस्थांनी म्हटले आहे की, आरबीआयने अमेरिकेकडून गुंतवणूक म्हणून खरेदी केलेल्या रोख्यांचे हे कर्ज असू शकते. त्यानुसार एका निर्धारित मुदतीत निर्धारित व्याजदराने आरबीआयला नफाही मिळतो. मात्र अमेरिकेसाठी ही देणेदारी आहे. मार्च २०२० मध्ये आरबीआयकडे १५६ अब्ज डॉलर्सचे रोखे होते. ते आता २१६ अब्ज डाॅलर्सवर गेले अाहेत.

Advertisement

संपादन : सचिन मोहन चोभे  

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply