दिल्ली :
देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घऱाजवळ स्फोटक साहित्याने भरलेली गाडी आढळल्यानंतर एकच खळबळ उडाली. ही कार रोडवर अंबानी यांच्या ‘अॅन्टिलिया’ निवास्थानाजवळ उभी करण्यात आली होती. गाडीत जिलेटिन या स्फोटकांच्या सुट्ट्या कांड्या होत्या अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
मुंबईत ज्या-ज्या ठिकाणांहून कार गेली आहे, तेथील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले होते. बर्यापैकी पुरावे हाती आल्याने आता आता सदर कृत्य करणारी व्यक्ती सापडण्याचा मार्ग मोकळा झाला असल्याचे समजत असताना एक मोठी बातमी समोर आली आहे.
अंबानींच्या घराबाहेर दोनच दिवसांपूर्वी स्फोटकांनी भरलेली कार आढळून आली होती. याची जबाबदारी जैश-उल-हिंदनं स्वीकारली आहे. स्फोटकांनी भरलेली कार आपणच ठेवली असल्याचा दावा करत पिक्चर अभी बाकी है, असा इशारादेखील जैश-उल-हिंद या दहशतवादी संघटनेनं दिला आहे.
एसयूव्हीमध्ये स्फोटकं ठेवणारे दहशतवादी सुरक्षितरित्या घरी पोहोचले असा दावा जैश-ए-हिंदनं टेलिग्राम मेसेजमधून केला आहे. मेसेजमधून अंबानी यांच्याकडे पैशांची मागणी करण्यात आली आहे.
अंबानींनी मागणी पूर्ण न केल्यास त्यांच्या मुलाच्या कारवर हल्ला करण्यात येईल, अशी धमकी जैशनं दिली आहे. ‘तुम्हाला काय करायचंय, याची कल्पना तुम्हाला आहे. तुम्हाला सांगितलेली रक्कम आम्हाला पाठवा आणि तुमच्या ‘फॅट किड्स’सोबत आनंदानं राहा,’ असं मेसेजमध्ये पुढे नमूद करण्यात आलं आहे.
या अनोळखी स्कार्पिओ गाडीत एक धमकीचे पत्रही होते. आणि या पत्रात थेट अंबानी कुटुंबाला सांभाळून राहण्यास सांगितले आहे. ‘डियर नीता भाभी और मुकेश भैय्या और फॅमिली.. ये तो सिर्फ ट्रेलर है अगली बार ये सामान पुरा हो क्या आयेगा तुम्हारे फॅमिली को उडाने..संभल जाना.’, असा मजकूर या पत्रात असल्याचे समजते.
संपादन : स्वप्नील पवार
कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com
| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल |
मो. 9503219649
ईमेल : krushirang@gmail.com
- शेळीपालन : लसीकरणाचे वेळापत्रक नक्की फॉलो करा; वाचा आणि अंमलबजावणीही करा
- शिक्षक-विद्यार्थी सर्वेक्षणातून पुढे आले ‘हे’ 5 मुद्दे; दहावी-बारावीची परीक्षा जूनमध्ये घेण्याची मागणी
- ‘त्यांच्या’सह अदानीही करणार ‘रिटेल क्रांती’; अमेझॉन, रिलायन्सपुढील आव्हाने वाढणार..!
- आयपीएल २०२१ : गोविंदाच्या जावयाची तुफानी खेळी; शाहरुखच्या केकेआरकडून घालतोय धुमाकूळ
- आयपीएल २०२१ : सेहवाग म्हणतो हैदराबादच्या पराभवासाठी ‘हा’ खेळाडू जबाबदार..!