Take a fresh look at your lifestyle.

म्हणून उभ्या पिकावर शेतकर्‍याला फिरवावा लागला नांगर; नगर जिल्ह्यात शेतकर्‍यावर आली ही वेळ

अहमदनगर :

Advertisement

शेतकर्‍यांच्या पिकाला कधी कधी इतका कवडीमोल भाव मिळतो की, त्याला ते पीक विकायला नेण्यासही परवडत नाही. आणि दुसर्‍या बाजूला शहरातील जनता मात्र 2 रुपयाने जुडी महागली तरी ‘महागाईचा भडका’ म्हणून उर बडवत असते. पिकाला भाव मिळत नाही, म्हणून एका शेतकर्‍याने चक्क ने कोबीच्या उभ्या पिकावर नांगर फिरविल्याची घटना नगर जिल्ह्यात घडली असल्याचे समोर आले आहे.

Advertisement

कर्जत तालुक्यातील कोपर्डी येथील शेतकरी नाना रामचंद्र सुद्रिक यांनी  ट्रक्टरच्या साहाय्याने उभ्या पिकावर नांगर फिरविला आहे. ही वेळ त्यांच्यावर आली कारण कोबीचा एक गड्डा केवळ एक रुपयाला विकला जात होता.

Advertisement

या कर्जत तालुक्यात कोबीचे उत्पादन मोठय़ा प्रमाणावर करण्यात येते. यावेळी हे प्रमाण खूपच जास्त असल्याने कोबीला एकदमच किरकोळ भाव मिळाला. परिणामी वाहतूक खर्चही शेतकर्‍यांना परवडेनासा झाला.

Advertisement

कर्जत तालुक्यामध्ये मोठय़ा प्रमाणामध्ये पालेभाज्या पिकवल्या जातात. याला सर्वात मोठे मार्केट पुण्यामध्ये मिळत आहे. रोज टेम्पो भरून कर्जतहून पालेभाज्या पुणे येथे विक्रीसाठी पाठवल्या जातात. मात्र कोबी शेतातून काढून बाजारात नेण्याचा खर्चही विक्रीतुन मिळत नसल्याने शेतकऱयांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. 

Advertisement

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply