Take a fresh look at your lifestyle.

निवडणूक अपडेट 2021 : भाजपला सर्वात मोठा फटका; कायम सर्वच जागा मिळवणार्‍या ‘त्या’ मित्रपक्षाने सोडली साथ

दिल्ली :

Advertisement

‘आमचेच खरे’ म्हणत कायमच मित्रपक्षांना ताब्यात ठेवणार्‍या आणि वेळप्रसंगी कुरघोडी करणार्‍या भाजपला आता ऐन निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फटका बसला आहे. शिवसेना, शिरोमणी अकाली दलापाठोपाठ आणखी एका तगड्या पक्षानं भारतीय जनता पक्षाची साथ सोडली आहे. त्यामुळे आता ऐन निवडणुक तोंडावर आलेली असताना भाजपची मोठी अडचण होणार आहे.

Advertisement

गेल्या काही महिन्यांपासून भाजपची अनेक मित्रपक्षांनी साथ सोडली. काही पक्ष छोटे होते तर काही मोठे होते. आता आसाममधील मित्रपक्षानं भाजपशी काडीमोड घेतल्याने भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील (एनडीए) आणखी एक पक्ष कमी झाला आहे.  

Advertisement

गेल्या ५ वर्षांपासून भाजपसोबत सत्तेत असलेल्या बोडोलँड पीपल्स फ्रंटनं निवडणूक जाहीर होताच भाजपला ‘दे धक्का’ केला. विशेष बाब म्हणजे 5 वर्षे भाजपसोबत सत्तेत राहिलेल्या या पक्षाने काँग्रेसच्या नेतृत्त्वाखालील आघाडीशी हातमिळवणी केली. 

Advertisement

आता भाजपला हा पक्ष सोबत नसल्याचा फटका येत्या निवडणुकीत बसणार, हे मात्र दिसत आहे. आसाममध्ये तीन टप्प्यात मतदान होणार आहे. २७ मार्च, १ एप्रिल आणि ६ एप्रिल रोजी आसाममध्ये मतदान होईल. २००६ पासून हा पक्ष या पट्ट्यातल्या १२ पैकी १२ जागा जिंकत आला आहे. याच पक्षानं आता काँग्रेसच्या नेतृत्त्वाखालील आघाडीत जाण्याचा निर्णय घेतला आहे.    

Advertisement

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply